Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता येणार 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'! फराह खान होस्ट करणार शो, तर निक्की तांबोळींसह उषा नाडकर्णी दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 17:17 IST

पहिल्यांदाच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये कलाविश्वातील सेलिब्रिटी सहभागी होणार असून त्यांच्या कुकिंगने ते प्रेक्षकांची मनं जिंकणार आहेत. या शोचा प्रोमो समोर आला आहे.

'मास्टर शेफ' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिएलिटी शो आहे. या शोमध्ये देशभरातील स्पर्धकांना त्यांचं कुकिंग टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. पण, आता पहिल्यांदाच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये कलाविश्वातील सेलिब्रिटी सहभागी होणार असून त्यांच्या कुकिंगने ते प्रेक्षकांची मनं जिंकणार आहेत. या शोचा प्रोमो समोर आला आहे.

'सेलिब्रिटी मास्टर शेफ'च्या प्रोमोमध्ये अनेक कलाकार दिसत आहेत. या प्रोमोमध्ये कलाकारांना आईस्क्रीम केक बनवण्याचं चॅलेंज देण्यात आल्याचं दिसत आहे. जे पाहून कलाकारांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं दिसत आहे. या शोचं परिक्षण मास्टरशेफ इंडिया फेम रणवीर बरार आणि विकास खन्ना करणार आहेत. तर फराह खान हा शो होस्ट करणार आहे. लवकरच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. 

'सेलिब्रिटी मास्टर शेफ'मध्ये कोणते स्पर्धक दिसणार?

'सेलिब्रिटी मास्टर शेफ'मध्ये तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, अर्चना गौतम, राजीव अदातिया, निक्की तांबोळी, फैसल मलिक, दीपिका कक्कड, उषा नाडकर्णी, कबिता सिंह हे कलाकार सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारफराह खानउषा नाडकर्णी