Join us  

कतरिनाच्या सासरेबुवांच्या साधेपणावर फिदा झालेत फॅन्स, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:34 PM

Shyam Kaushal at 83 Screening : श्याम कौशल यांचा साधेपणा आणि सच्चेपणा चाहत्यांना भावला. दिल जीत लिया, प्यारे हो अंकल आप अशा कमेंट अनेक युजर्सनी केल्या.

रणवीर सिंगचा (Ranveer Singh) ‘83’ हा सिनेमा उद्या शुक्रवारी चित्रपटगृहांत रिलीज होतोय. तूर्तास या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग झाली आणि या इव्हेंटला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. दिग्दर्शक कबीर खान, त्यांची पत्नी मिनी माथूर, सुनील गावस्कर, कपिल देव, रवी शास्त्री, पंकज त्रिपाठी, करण जोहर, आलिया भट, आयुष्यमान खुराणा असे सगळे सेलिब्रिटी यावेळी दिसले. पण या सगळ्यांमध्ये एक चेहरा वेगळा ठरला आणि या चेहऱ्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. होय, हा चेहरा होता श्याम कौशल (Sham Kaushal) यांचा.  

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचे (Vicky Kaushal) वडील आणि कतरिना कैफचे (katrina kaif) सासरे श्याम कौशल यांचा या इव्हेंटमधील साधेपणा पाहून प्रत्येकजण अवाक् झाला. श्याम कौशल यांनी एका कॅमेरामॅनच्या डोक्यावरून ज्या प्रेमाने हात फिरवला, ते पाहून तर अनेकजण श्याम यांच्या प्रेमात पडले.

याचा एक व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. ‘83’ पाहून परतत असताना फोटोग्राफर्स श्याम कौशल यांना थांबवून सिनेमा कसा वाटला? असा प्रश्न करतात. यावर, मी आजपर्यंत जितके सिनेमे पाहिलेत, त्यापैकी हा एकबेस्ट सिनेमा आहे, असं ते म्हणतात. रणवीरचंही भरभरून कौतुक करतात. यानंतर ते जायला निघतात आणि त्यांची नजर एका कॅमेरामॅनवर पडते. ते त्याच्या खांद्यावर हात ठेवतात, त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि पापाराझींचं कौतुक करत, तुम्ही सगळे खूप चांगले आहात, असं म्हणतात.

श्याम कौशल यांचा हा साधेपणा आणि सच्चेपणा चाहत्यांना भावला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी श्याम यांच्या प्रेमात पडले आहेत. दिल जीत लिया, प्यारे हो अंकल आप अशा कमेंट अनेक युजर्सनी केल्या.

तुम्हाला ठाऊक आहेच की, विकीचे पापा श्याम हे इंडस्ट्रीचे लोकप्रिय अ‍ॅक्शन डायरेक्टर आहेत. अनेक मोठ्या चित्रपटांचे अ‍ॅक्शन सीन्स त्यांनी डायरेक्ट केले आहेत. सूनबाई कतरिना कैफ हिच्या ‘फँटम’ या चित्रपटाचे अ‍ॅक्शन सीन्सही त्यांनीच डायरेक्ट केले होते. 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ८३ सिनेमारणवीर सिंगबॉलिवूड