नागराज मंजुळें(Nagraj Manjule)चा 'फॅंड्री' (Fandry Movie) हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. यातील जब्या आणि शालूची जोडी हिट ठरली. आता हा चित्रपट रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे. तरीदेखील ते दोघे प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या सिनेमात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघाडे(Somnath Awaghade)ने तर शालूची भूमिका राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने साकारली होती. या चित्रपटानंतर ते घराघरात पोहचले. त्या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. त्या दोघांना आता ओळखणे खूप कठीण झाले आहे. दरम्यान आता ते दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांचा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यात ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
सोमनाथ अवघाडेने इंस्टाग्रामवर राजेश्वरी खरातसोबतचा फोटो शेअर केला आहे. यात ते दोघे एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. त्याने हा फोटो शेअर करत दोन इमोजी शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. ते दोघे खऱ्या आयुष्यातही खूप छान दिसतात अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
यापूर्वीही सोमनाथ आणि राजेश्वरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. त्यात ते दोघे लग्नाच्या गेटअपमध्ये दिसले होते. त्यानंतर त्या दोघांनी खऱ्या आयुष्य़ात लग्न केल्याचेही बोलले जात होते. मात्र या चर्चेत अजिबात तथ्य नसून ते दोघे एका सिनेमात एकत्र काम करत आहेत. त्याच्यामध्ये त्या दोघांचे लग्न होताना दाखवले होते. मात्र हा सिनेमा कोणता आहे. याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही.
राजेश्वरी आणि सोमनाथ सोशल मीडियावर आहेत सक्रीय
दरम्यान, राजेश्वरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असेत. त्यामुळे ती चर्चेत येत असते. तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा होताना दिसते. तर सोमनाथदेखील सोशल मीडियावर सक्रीय असतो आणि तो आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टची अपडेट देताना दिसतो.