Join us
Daily Top 2Weekly Top 5

Esha Deol Divorce: "दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर...", भरतच्या वागण्याबद्दल ईशाने केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 10:01 IST

"माझ्यामुळे त्याची चिडचिड व्हायची", भरत तख्तानीबद्दल ईशाने केलं होतं मोठं विधान

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशाचा संसार मोडला आहे. ईशा आणि भरत तख्तानी लग्नाच्या १२ वर्षांनंतर घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर ईशा आणि भरतने घटस्फोट घेत कायदेशीररित्या वेगळं झाल्याचं सांगतिलं. परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

ईशा आणि भरत यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. ईशाने 'अम्मा मिया : स्टोरीज, अॅडवाइस अँड रेसिपी' या तिच्या पुस्तकात दोघांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर भरतला ईशाकडून दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायचं, असं तिने पुस्तकात म्हटलं आहे. ईशा म्हणते, "दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर थोड्या वेळासाठी भरतची माझ्यामुळे चिडचिड व्हायची, हे मला जाणवलं होतं. मी त्याला वेळ देत नसल्याचं त्याला वाटत होतं. एखाद्या पतीला असं वाटणं साहजिकच आहे. तेव्हा मी राध्याची शाळा आणि मियाराच्या संगोपनात व्यग्र असायचे. याशिवाय मी माझं पुस्तक लिहित होते आणि माझ्या प्रोडक्शनच्या मिटिंग्सही सुरू होत्या. त्यामुळे त्याला दुर्लक्षित झाल्यासारखं वाटत होतं. मला आठवतंय त्याने माझ्याकडे नवीन टुथब्रश मागितला होता आणि मी विसरून गेले. त्याचा शर्ट मी इस्त्री केलेला नव्हता. त्याला डब्यात काय दिलंय हे चेक न करताच मी ऑफिसला पाठवलं होतं." 

"त्याच्या गरजा खूप कमी आहेत. पण, जर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग गोष्टी बिघडतात. भरत वेगळा आहे. त्याला न पटणाऱ्या गोष्टी तो माझ्या तोंडावर सांगतो. मी बऱ्याच दिवसापासून सिनेमा बघायला किंवा डेटवर गेले नव्हते, हे मला जाणवलं. म्हणून मग मी त्याच्याबरोबर वीकेंडला बाहेर पडायला लागले," असंही ईशाने पुढे म्हटलं होतं. 

ईशाने जून २०१२ साली बिझनेसमॅन भरत तख्तानीबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नाआधी त्यांनी काही वर्ष डेटिंग केलं होतं. पण, आता ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. "आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील या बदलानंतर आमच्या दोन्ही मुलांचे कल्याण सर्वात महत्वाचे राहील," असं त्या दोघांनीही म्हटलं आहे. 

 

टॅग्स :इशा देओलसेलिब्रिटीघटस्फोट