सध्या दिवाळीत रिलीज होणाऱ्या 'रामायण' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात सीतेची भूमिका साऊथ अभिनेत्री साई पल्लवी साकारणार आहे. साई या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे अशी चर्चा असतानाच 'रामायण' आधीच साईचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. यात ती आमिर खानचा लेक जुनैद खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 'एक दिन' असं या सिनेमाचं नाव असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये काय आहे खास? आमिर खान प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना एका हळव्या प्रेमकथेची अनुभव देतोय. ट्रेलरची सुरुवात एका 'फॉर्च्यून बेल'ने (नशीबाची घंटा) होते, जिथे प्रेमी युगुलं आपल्या खऱ्या प्रेमासाठी प्रार्थना करतात. यात जुनैद साई पल्लवीसाठी एक इच्छा मागताना दिसतो – "मीरा माझी व्हावी, मग ते फक्त एका दिवसासाठी का असेना." इथूनच त्यांच्या एका दिवसाच्या अनोख्या प्रेमकथेचा प्रवास सुरू होतो. ट्रेलरमध्ये अनेक भावनिक प्रसंग आणि साई पल्लवीचा दमदार अभिनय बघायला मिळतोय.
'एक दिन' या चित्रपटाच्या निमित्ताने साई पल्लवी आणि जुनैद खान ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दोघांमधील साधेपणा आणि रोमँटिक केमिस्ट्री ट्रेलरमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. निर्मात्यांनी हा ट्रेलर शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, "कधीकधी एक दिवस देखील पुरेसा असतो." 'एक दिन' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले होते, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
Web Summary : Sai Pallavi's Bollywood debut 'Ek Din,' co-starring Aamir Khan's son Junaid, precedes 'Ramayana'. The trailer unveils a tender love story set around a wishing bell, promising emotional moments and fresh on-screen chemistry. Releasing May 1, 2026.
Web Summary : साई पल्लवी का बॉलीवुड डेब्यू 'एक दिन,' आमिर खान के बेटे जुनैद के साथ, 'रामायण' से पहले। ट्रेलर एक विशिंग बेल के आसपास स्थापित एक कोमल प्रेम कहानी का अनावरण करता है, जो भावनात्मक क्षणों और ताज़ा ऑन-स्क्रीन केमिस्ट्री का वादा करता है। 1 मई, 2026 को रिलीज़ हो रही है।