बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी लवकरच एका गोड प्रेमकथेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'आमिर खान प्रॉडक्शन्स'च्या बॅनरखाली तयार झालेल्या 'एक दिन' या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला असून, त्याने सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
काय आहे टीझरमध्ये?
टीझरची सुरुवात अतिशय शांत आणि रोमँटिक पद्धतीने होते. यामध्ये जुनैद आणि साई पल्लवी एका बर्फाळ प्रदेशात एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. "मला तुझं हसणं खूप आवडतं मीरा... मला माहीत नाही, मी तुझं मन जिंकू शकेन की नाही," असा जुनैदचा संवाद आणि साई पल्लवीचे नैसर्गिक हास्य प्रेक्षकांना भावत आहे. टीझरमधील निसर्गरम्य दृश्ये आणि या नवीन जोडीची केमिस्ट्री लक्षवेधी ठरत आहे.
चित्रपटाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
'एक दिन' या चित्रपटाद्वारे साई पल्लवी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून, आमिर खान आणि मन्सूर खान १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा निर्माता म्हणून एकत्र आले आहेत. यापूर्वी त्यांनी 'जाने तू... या जाने ना' या सुपरहिट चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. 'एक दिन' हा २०१६ मधील थाई चित्रपट 'वन डे' (One Day) चा अधिकृत रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. ही एक हृदयस्पर्शी प्रेमकथा असून 'वन लव्ह... वन चान्स' अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. चित्रपटाचे संगीत राम संपत यांनी दिले असून गाणी इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत.
चित्रपटाच्या टीझरसोबतच त्याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 'एक दिन' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जुनैद खानने यापूर्वी 'महाराज' आणि 'लवयापा' सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे, तर साई पल्लवी तिच्या नॅचरल ॲक्टिंगसाठी आधीच देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Web Summary : Junaid Khan and Sai Pallavi star in 'Ek Din,' a romantic drama produced by Aamir Khan Productions. The teaser showcases their chemistry in a scenic setting, with the film set to release on May 1, 2026. It's a remake of the Thai film 'One Day'.
Web Summary : आमिर खान प्रोडक्शंस की फिल्म 'एक दिन' में जुनैद खान और साई पल्लवी की जोड़ी दिखेगी। टीज़र में उनकी केमिस्ट्री और बर्फीले दृश्य हैं। यह फिल्म 1 मई, 2026 को रिलीज़ होगी और थाई फिल्म 'वन डे' का रीमेक है।