Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 08:32 IST

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या सर्व चाहत्यांनी अभिनेत्रीचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

'दृश्यम' सिनेमा सर्वांनी पाहिला असेलच. या सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. 'दृश्यम' सिनेमात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. 'दृश्यम' सिनेमातील अभिनेत्री इशिता दत्ता (ishita dutta) दुसऱ्यांदा आई झाली असून तिला मुलगी झाली आहे. इशिताचा पती वत्सल शेठ (vatsal seth) हा सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. इशिता दुसऱ्यांदा आई झाल्याने वत्सल-इशिता आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे.

इशिता दुसऱ्यांदा झाली आई

इशिताने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत इशिता, तिचा मुलगा, पती वत्सल सेठ बघायला मिळतात. इशिता हॉस्पिटलमध्ये असून तिच्या कडेवर बाळ दिसतं. इशिताने बाळाचा चेहरा मात्र दाखवला नाही. इशिताने हा फोटो पोस्ट करुन कॅप्शन लिहिलंय की, 'दोन पासून चार हृदयं एकत्र धडधड करत आहेत. आमचं कुटुंब पूर्ण झालं. मुलीचा जन्म झाला.' इशिताने हा खास फोटो पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी इशिताचं अभिनंदन केलं असून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

इशिता आणि वत्सल सेठ दोघेही सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. 'रिश्तों का सौदागर-बाजीगर' या मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री जुळली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१७ त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. १९ जुलै २०२३ ला त्यांना मुलगा झाला. या मुलाचं नाव त्यांनी वायु ठेवलं. त्यानंतर दोन वर्षांनी इशिता-वत्सल दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. इशिता लवकरच आपल्याला अजय देवगणसोबत आगामी 'दृश्यम ३' मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :दृश्यम 2अजय देवगणप्रेग्नंसीगर्भवती महिला