Join us

अभिनेत्रीने वॉचमनसोबत केला होता डेब्यू, चित्रपट सुपरहीट होताच मिळाल्या 34 सिनेमांत ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 15:31 IST

करिअरच्या ऐनभरातच किमीने लग्न करत संसाराला सुरुवात केली. प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनु यांनी किमीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. किमीलाही शांतनु आवडत होते त्यामुळे तिनं होकार द्यायला फारसा वेळ घेतला नाही. संसारात रमल्यानंतर किमीही चंदेरी दुनियेपासून हळूहळू दूर होत गेली.

जुम्मा... चुम्मा दे दे' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री किमी काटकर आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या गाण्यातील किमी काटकरने चाहत्यांवर अशी काही जादू केली की तिची लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. अभिनयावर नाही तर चाहते तिच्या सौंदर्याच्याही प्रेमात पडायचे. किमी काटकरनं वयाच्या १७ व्या वर्षी मॉडलिंग क्षेत्रात करिअरला सुरुवात केली होती. 'पत्थर दिल' या सिनेमातून किमीने इंडस्ट्रीत पदार्पण केले. तिचा पहिला सिनेमा मात्र सुपरफ्लॉप ठरला.  

 

यानंतर ती टार्जन सिनेमात झळकली. सिनेमातला किमीचा ग्लॅमरस आणि आकर्षक लूक मात्र लोकांच्या प्रचंड पसंतीस पडला. सिनेमात हेमंत बिरजे किमीचा हिरो म्हणून झळकला होता. या दोघांच्या जोडीलाही रसिकांना प्रचंड आवडली होती. या सिनेमामुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण तुम्हाला माहिती आहे का? हेमंत बिरजे खऱ्या आयुष्यामध्ये दिग्दर्शकाच्या घरी वॉचमनचे काम करायचे. 

हेमंतची पर्सनालिटी दिग्दर्शकाला आवडली होती. सिनेमातल्या भूमिकेसाठी अशाच  हाइटेट आणि मस्कुलर बॉडी असणा-या हिरोचा शोध सुरु होता. सिनेमाच्या भूमिकेला साजेशा हेमंत होताच त्यामुळे त्यालाच सिनेमात कास्ट केले होते. सिनेमात खूपच बोल्ड सीन होते ज्यामुळे किमीकडे  एक बोल्ड अभिनेत्री म्हणून पाहिले जाऊ लागले.

 

इंटिमेट सीनमुळे हेमंतचीही प्रचंड चर्चा झाली होती.विशेष म्हणजे इतके बोल्ड सीन देणारा हेमंत हा त्यावेळचा पहिला अभिनेता ठरला होता. यानंतर हवे तसे यश हेमंत बिरजेला मिळाले नाही. पण किमीची करिअरची गाडी मात्र सुस्साट होती.किमीनं त्याकाळचे बडे स्टार म्हणजेच जितेंद्र, अनिल कपूर, गोविंदा यांच्यासोबतही काम केलं. गोविंदासोबत किमीच्या जोडीला लोकांचीही पसंती मिळाली. बॉलिवूडमधील 7 वर्षांच्या कारकिर्दीत किमीने सुमारे 45 सिनेमात काम केले होते.

करिअरच्या ऐनभरातच किमीने लग्न करत संसाराला सुरुवात केली. प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनु यांनी किमीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. किमीलाही शांतनु आवडत होते त्यामुळे तिनं होकार द्यायला फारसा वेळ घेतला नाही. संसारात रमल्यानंतर किमीही चंदेरी दुनियेपासून हळूहळू दूर होत गेली. अनिल कपूर सोबतचा ‘हमला’ हा शेवटचा सिनेमात ती झळकली होती.

 

 

इंडस्ट्री बाहेरून जशी दिसते तितकीच आतून खूप निराशादायी वातावरण असते.जे तिला अजिबात आवडत नव्हते. आपल्याला हव्या तशा भूमिका साकारायच्यात तसे सिनेमा बनत नसल्याने सिनेसृष्टीपासून दूर जात असल्याचे तिने सांगितलं होतं.

टॅग्स :किमी काटकरअनिल कपूर