Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखलंत का हिला? फोटोत दिसणारी ही क्युट चिमुरडी आज आहे टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:41 IST

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील असे बरेच कलाकार आहेत ज्यानी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकार म्हणून केली.

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील असे बरेच कलाकार आहेत ज्यानी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकार(childhood actor) म्हणून केली. हे बालकार आता बरेच मोठे झालेत त्याचे सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंगदेखील आहे.आम्ही आज तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांंगणार आहोत जी शाहिद कपूरच्या विवाह सिनेमात दिसली होती. यात तिने रजनीची भूमिका साकारली होती. 

फोटोत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री अदिती भाटिया आहे. 'ये है मोहब्बतें' या मालिकेत इशिताच्या मुलीची रुही भल्लाची भूमिका तिने साकारली होती. अभिनेत्री आदिती भाटियाने केवळ टीव्ही मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अभिनेत्रीने शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या विवाह या चित्रपटात पूनमची धाकटी बहीण रजनीची बालपणीची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर या चित्रपटात त्याला चाहत्यांनी खूप पसंत केले होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, अभिनेत्री अदिती भाटिया शेवटची ये है मोहब्बते मालिका आणि रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये दिसली होती, ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्याचवेळी चाहते पुन्हा एकदा पडद्यावर दिसण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकार