Join us

कतरिना कैफला ह्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये करायचंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 06:00 IST

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'नंतर कतरिना कैफ 'झिरो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच ती बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानसोबत भारत चित्रपटातही झळकणार आहे.

ठळक मुद्देबबीता कुमारच्या भूमिकेत दिसणार कतरिना कैफ

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ सध्या बिग बजेट चित्रपटात काम करते आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'नंतर कतरिना कैफ 'झिरो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच ती बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानसोबत भारत चित्रपटातही झळकणार आहे.

नुकतेच कतरिना कैफला चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विचारले की, कोणती भूमिका तुला सदैव सोबत ठेवायची आहे आणि कोणती भूमिका विसरायची आहे. त्यावर कतरिना म्हणाली की,' मी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे कोणतीही भूमिका मला विसरायची नाही. मात्र मी साकारलेल्या दोन भूमिका नेहमीच माझ्या जवळ राहणार आहेत. त्यातील एक राजनिती व दुसरी भूमिका जिंदगी न मिलेगी दोबारा. 'दिग्दर्शिका जोया अख्तरचा 'जिंदगी न मिलेगी दोबारा' चित्रपटाच्या सीक्वलबद्दल कतरिनाने सांगितले की, मी जेव्हा पण जोया भेटेल तेव्हा तिला 'जिंदगी न मिलेगी दोबारा'च्या सीक्वल बनवायला सांगणार आहे. जिंदगी न मिलेगी दोबारा चित्रपटात कतरिना कैफसोबत हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर व कल्कि कोचलिन मुख्य भूमिकेत आहेत.'झिरो' चित्रपटात कतरिना कैफने बबीता कुमारीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबाबत तिने सांगितले की, ही भूमिका खूपच वेगळी आहे. ही भूमिका साकारायला खूप मजा आली. ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा कतरिना कैफला आहे.

टॅग्स :झिरो सिनेमाकतरिना कैफ