Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांका त्रिपाठीने विवेक दाहियाची केली प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 06:30 IST

टीव्हीच्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया हे दोघे एकत्र रेड कार्पेटवर दाखल होताच त्यांच्यातील घट्ट प्रेमबंध सर्वांनाच दिसून येत होते.

यंदाच्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात ग्लॅमर आणि चंदेरी दुनियेसोबत प्रेमाचे रंगही भरपूर प्रमाणात उधळत असलेले दिसून येत होते. टीव्हीच्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया हे दोघे एकत्र रेड कार्पेटवर दाखल होताच त्यांच्यातील घट्ट प्रेमबंध सर्वांनाच दिसून येत होते. या दोघांची जोडी प्रत्यक्षातही एकमेकाला अतिशय अनुरूप दिसते आणि हे दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेल्याचे प्रेक्षकांनाही जाणवत होते.

रेड कार्पेटवर गुलाबी वेशातील दिव्यांका आणि तिला शोभेलसा रुबाबदार सूट घालून आलेला विवेक यांचे आगमन होताच सर्वांच्या माना त्यांच्या दिशेने फिरल्या. या सोहळ्यात सर्वात देखणा तरुण कोण होता, या प्रश्नावर दिव्यांकाने पापणीही न लवता विवेकचे नाव घेतले. “विवेक एरव्हीही देखणाच दिसतो; पण आजच्या या सूटमध्ये तो जरा जास्तच राजबिंडा दिसत आहे. आजच्या या सोहळ्यातला तो सर्वात देखणा तरुण आहे, यात शंका नाही. इतका देखणा तरुण माझा आहे, ही गोष्ट मला सुखावते आहे आणि त्याच्याबरोबर रेड कार्पेटवर चालण्यात एक वेगळीच मजा येत आहे. टीव्हीवरील या सर्वात मोठ्या सोहळ्याबद्दल आमच्या मनात खूप उत्सुकता लागून राहिली आहे. या कार्यक्रमात मीसुद्धा एक नृत्य सादर करणार असून तसे नृत्य मी प्रथमच सादर करणार असल्याने माझ्या मनात त्याविषयी उत्सुकता भरली आहे, असे दिव्यांकाने सांगितले.‘स्टार प्लस’वरील ‘ये है मोहब्बतें’मधील ईशिताच्या भूमिकेने सर्वांची लाडकी अभिनेत्री बनलेल्या दिव्यांकाने या कार्यक्रमात सादर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांना भारून टाकले. तिकडे विवेकने आपल्या विनोदी नाट्याने प्रेक्षकांची भरपूर करमणूक केली. अनेक मान्यवर आणि लोकप्रिय टीव्ही कलाकारांच्या सहभागामुळे यंदाचा ‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळा’ हा आजवरचा सर्वात मोठा आणि अधिकच देखणा झाला. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीविवेक दहिया