Join us  

दिशा पाटनीच्या बहिणीचा व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, 'आर्मी ऑफिसर असून पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 2:35 PM

खुशबी पाटनी भारतीय सैन्य अधिकारी आहे. मात्र या व्हिडिओमध्ये...

बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पाटनी (Disha Patani) . दिशाने तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. आधी टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून तिला ओळखलं जायचं. पण आता तिची स्वत:ची वेगळी ओळख आहे. दिशा अभिनय क्षेत्रात असली तरी तिची सख्खी बहीण खुशबू पाटनी (Khushboo Patani) आर्मी ऑफिसर आहे. मात्र दिसायला ती सुद्धा बहिणीप्रमाणेच सुंदर आहे. नुकतंच दिशाने खुशबूचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला. मात्र नेटकऱ्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं आहे.

दिशा पाटनी अनेकदा तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती ट्रोलही झाली आहे. आता तिच्या बहिणीवरही नेटकरी चिडलेत. दिशाची बहीण खुशबू आर्मी ऑफिसर आहे. दिशाने बहिणीचा एक क्युट व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये खुशबू टीव्हीसमोर डान्स करत आहे. यात तिने लाँग टीशर्ट आणि शॉर्ट्स घातले आहेत. 'सर्वात चांगला व्यायाम, शरीर आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर' असं कॅप्शन दिशाने लिहिलं आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

खुशबूचा डान्स तर नेटकऱ्यांना आवडला पण तिने शॉर्ट्स घातले असल्याने तिला ट्रोल केलं जात आहे. 'यार ही सुद्धा कपड्यांबाबतीत बहिणीसारखीच निघाली','तू भारतीय आर्मी ऑफिसर आहेस, कमीत कमी तू तरी चांगले कपडे घाल' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी खुशबूची बाजू घेतली आहे. 'ती आपल्या घरात डान्स करतीये गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये नाही' अशी कमेंट एकाने केली आहे. तर 'भाई इंडियन आर्मीतली मुलगी आहे, स्वॅग तर असणारच' अशीही कमेंट एका चाहत्याने केली आहे.

 

टॅग्स :दिशा पाटनीपरिवारसोशल मीडियाट्रोल