Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:04 IST

६-६ व्हॅनिटी व्हॅन, आरसा धरायला वेगळा माणूस अन् बरंच काही, पहलाज निहलानींचा खुलासा

दिग्दर्शक आणि सेन्सर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी (Pahalaj Nihalani) यांनी बॉलिवूड कलाकारांची पोलखोल केली आहे. सिनेमा करताना त्यांच्या काय काय अवाजवी मागण्या असतात याचा त्यांनी खुलासा केला आहे. अभिनेत्यांच्या वाढत्या मानधनावरही त्यांनी बोट ठेवलं आहे. तसंच सिनेमाच्या कास्टिंगमध्येही अभिनेते दखल देतात जे त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं असं ते म्हणाले. एका अभिनेत्याचं नाव घेत त्यांनी हा खुलासा केला आहे. नक्की काय म्हणाले पहलाज निहलानी वाचा.

अक्षय कुमारबद्दल काय म्हणाले पहलाज निहलानी?

'लर्न फ्रॉम द लीजेंड'या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पहलाज निहलानी म्हणाले, "आधी दिग्दर्शक आणि निर्माते कास्टिंग ठरवायचे. पण आता अभिनेतेही कास्टिंगमध्ये दखल द्यायला लागले आहेत. माझ्या सिनेमात कास्टिंगमध्ये लक्ष घालणारा पहिला हिरो होता अक्षय कुमार. २००२ साली 'तलाश' सिनेमात आम्ही काम केलं. अक्षय मला म्हणाला 'सिनेमा उद्याच सुरु करायचा तर करा आणि तुम्हाला हवं ते मानधन तुम्ही मला देऊ शकता, फक्त या सिनेमात करीना कपूरलाच घ्या.' माझ्या करिअरमध्ये असं पहिल्यांदाच घडलं की एक अभिनेता त्याला हवी असलेल्या अभिनेत्रीला कास्ट करण्याची मागणी करत आहे. हा सिनेमा तेव्हाच्या सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक होता. २२ कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा बनला."

६ व्हॅनिटी व्हॅन मागतात, लाज वाटली पाहिजे

ते पुढे म्हणाले, "इंडस्ट्रीतील वर्क कल्चर अवाजवी मागण्यांमुळे पूर्णपणे बदललं आहे. जिथे एक व्यक्ती काम करत होता तिथेच आता १० लोक काम करत आहेत. आधी एख व्हॅनिटी असायची, पण आता अभिनेत्याला ६ व्हॅनिटी लागते. एक एक्सरसाईजसाठी, एक किचनसाठी, एक मीटिंगसाठी वगैरे. ६ व्हॅनिटी व्हॅन मागणाऱ्यांना खरंच लाज वाटली पाहिजे."

कलाकारांना सकाळी डाएट फूड आणि रात्री ड्रग्स हवे

"आधी कलाकारांसोबत मेकअपमन असायचे. आता त्यांना हेअर ड्रेसर हवे इतकंच नाही तर आरसा पकडण्यासाठीही एक व्यक्ती त्यांना हवा असतो. बिनकामाचं दीड लाख रुपयांचं बिल ते तुमच्यासमोर आणून ठेवतात. आधी कलाकार घरुनच जेवणाचा डबा आणायचे पण आता त्यांना डाएट फू़ड हवं असतं. रात्री ड्रग्स घेतात आणि सकाळी डाएट फूड."

टॅग्स :पहलाज निहलानीबॉलिवूड