'रामायण' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय सनी देओल पवनपुत्र हनुमानाची भूमिका साकारणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण'चा पहिला टीझर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये रणबीर कपूरला आपण सर्वांनी श्रीरामांच्या भूमिकेत पाहिलं. अशातच 'रामायण'चे दिग्दर्शक नितेश तिवारींनी सिनेमातील त्यांच्या आवडत्या प्रसंगाबद्दल खुलासा केला आहे.हा आहे नितेश तिवारींचा आवडता सीन
'रामायण'च्या टीझर लाँचवेळी नितेश तिवारींनी सांगितलं की, ''राम जेव्हा वनवासाला जायला निघतात त्यावेळची ती भावना मी योग्य प्रकारे दाखवू शकलो की नाही, हे मला बघायचंय. राम वनवासास जावे, ही कोणाचीच इच्छा नाही. सर्वजण श्रीरामांसह रडत आहेत. हा प्रसंग माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. जेव्हा जेव्हा मी हा प्रसंग पाहतो तेव्हा मला रडायला येतं. मला आशा आहे की, प्रेक्षकांवरही या सीनचा परिणाम होईल.''
Web Summary : Director Nitesh Tiwari shared his favorite 'Ramayana' scene: Ram's exile. He finds the emotional departure deeply moving, anticipating a powerful audience reaction to the scene in the upcoming film starring Ranbir Kapoor.
Web Summary : निर्देशक नितेश तिवारी ने अपना पसंदीदा 'रामायण' दृश्य साझा किया: राम का वनवास। रणबीर कपूर अभिनीत आगामी फिल्म में इस दृश्य पर दर्शकों की शक्तिशाली प्रतिक्रिया की उम्मीद करते हुए, उन्हें भावनात्मक विदाई गहराई से छूती है।