Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या सासूला वाटायचं त्यांचा जावई आहे 'गे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 06:00 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या सासूला वाटायचं की त्यांचा जावई गे आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा नुकताच मिशन मंगल चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात त्याच्यासोबत विद्या बालन, किर्ती कुल्हारी, तापसी पन्नू, शर्मन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. अक्षय कुमारच्या बाबतीतील मजेशीर गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे त्याची सासू म्हणजे ट्विंकल खन्नाची आई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा आणि त्यांनी त्यांच्या मुलीला सल्लादेखील दिला होता. 

एका शोमध्ये काही वर्षांपूर्वी ट्विंकल खन्नाने सांगितलं होतं की, तिच्या आईला अक्षय कुमार गे असल्याचं वाटत होतं. त्यामुळे आमचं लग्न होऊ नये असं त्यांना वाटत होतं. ट्विंकलला प्रपोज केल्यानंतर जेव्हा तिने आईला अक्षयने लग्नासाठी मागणी घातल्याचं सांगितलं तेव्हा त्या चकीत झाल्या.

ट्विंकल खन्नाला एका पत्रकार मित्रानं सांगितलं होतं की अक्षय गे आहे. डिंपल कपाडियाने मुलीला सल्ला दिला की तू व अक्षय एक वर्ष एकत्र रहा आणि मग पुढे काय करायचं ते ठरवा.

 भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे.  कारण अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून  प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो.

आत्तापर्यंत तो प्रत्येक चित्रपटासाठी २७ कोटी मानधन घेत असे. मात्र वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय.  अक्षय कुमार 'गुड न्यूज' व 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्नाडिम्पल कपाडिया