Join us
Daily Top 2Weekly Top 5

चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 14:51 IST

दिलजीतने ट्विट करत कंगनाला सुनावले होते. तो म्हणाला होता की, एखाद्याने इतकंही आंधळं असू नये. यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं.

कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉरला दोन दिवस झाले. कंगनाने एका वयोवृद्ध शेतकरी महिलेला ओळखण्यात चूक केली आणि त्यांच्याबाबतची एक फेक न्यूज ट्विटरवर पोस्ट केली होती. नंतर ती पोस्ट तिने डिलीट केली. ती या महिलेबाबत म्हणाली होती की, ती १०० रूपया प्रोटेस्टसाठी अव्हेलेबल होते.  यावर दिलजीतने ट्विट करत कंगनाला सुनावले होते. तो म्हणाला होता की, एखाद्याने इतकंही आंधळं असू नये. यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं. यामुळे चर्चेत आलेल्या दिलजीत दोसांजचे ट्विटरवर ४ लाख फॉलोअर्स वाढले आहेत.

कंगना म्हणाली होती करन के पालतू

दिलजीतने कंगनावर संताप व्यक्त केल्यावर कंगनानेही त्याला अपशब्द वापरत उत्तर दिलं होतं. कंगनाने त्याच्यासाठी ट्विटमध्ये करण 'जोहर के पालतू' आणि 'चमचा' असे शब्द वापरले होते. यानंतर पंजाबी भाषेत दिलजीतने कंगनाचा चांगलाच पानउतारा केला होता. यावर अनेक सेलिब्रिटी दिलजीतच्या सपोर्टमध्ये आले होते. दिलजीतला सपोर्ट देण्यासाठी अनेक लोक पंजाबीमध्ये ट्विट करत होते. (ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल...)

न्यूज१९च्या रिपोर्टनुसार, या वादानंतर दिलजीतचे ४ लाख फॉलोअर्स वाढले आहेत. दिलजीतचे आता ४.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. दिलजीतच्या फॉलोअर्सची संख्या बुधवारी अधिक वाढल्याचे सांगण्यात येत आहेत. दरम्यान कंगना विरोधात लीगल केसही फाइल करण्यात आली आहे. शेतकरी महिलेचा अपमान करण्यावरून ही केस फाइल करण्यात आली आहे. 

टॅग्स :दिलजीत दोसांझट्विटरकंगना राणौतबॉलिवूड