Join us

भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा...; दिलीप कुमार यांना 'बिग बीं'ची अनोखी मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 10:22 IST

Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी दिलीप कुमार यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज नेते अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar Death) यांनी आज वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून जबर धक्का बसला आहे. दिलीन कुमार एक अभिनेते नव्हते तर सिनेमाची एक संस्था होते. भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दिलीप कुमार यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.अजय देवगण, अक्षय कुमार, मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ आदी अभिनेत्यांनी सोशल मीडियावर या महान अभिनेत्याला श्रद्धांजली देत शोक व्यक्त केला आहे.पाहुया, बॉलिवूड कलाकारांचे काही ट्वीट...

 

टॅग्स :दिलीप कुमारअमिताभ बच्चनबॉलिवूड