Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती", MC Stan बरोबरच्या फोटोंमुळे MS धोनी ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:35 IST

धोनीचे 'बिग बॉस विजेता' आणि रॅपर एमसी स्टॅनबरोबरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. 

क्रिकेटचं मैदान गाजवलेला महेद्रसिंग धोनी हा कायमच चर्चेत असतो. धोनीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.  पण, सध्या धोनीवर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांनी थालावरील नाराजी व्यक्त केली आहे. धोनीचे 'बिग बॉस विजेता' आणि रॅपर एमसी स्टॅनबरोबरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. 

रॅपर एमसी स्टॅनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन धोनीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये धोनी स्टॅनबरोबर फोटोसाठी काही पोझ देताना दिसत आहे. एका शूटसाठी एमसी स्टॅन आणि धोनी एकत्र आले होते. तेव्हाचे फोटो स्टॅनने पोस्ट केले आहेत. या फोटोला त्याने "काहीतरी कूल थालाबरोबर शूट केलं आहे," असं कॅप्शन दिलं आहे. स्टॅनबरोबर धोनीला पोझ देताना पाहून मात्र चाहते नाराज झाले आहेत. या फोटोंवर कमेंट करत त्यांनी धोनीला ट्रोल केलं आहे. 

एकाने कमेंट करत "अशी काय मजबुरी होती धोनी भाई" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "धोनी त्याचा वेळ वाया घालवतानाचा फोटो", अशी कमेंट केली आहे. "धोनीला टाइम वेस्ट करताना पहिल्यांदा बघत आहे," असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. "थालाची एकमेव चूक" अशी कमेंटही केली आहे. "धोनी भाई कोणत्या गोष्टीची कमी होती?" असंही एकाने म्हटलं आहे. "धोनीकडून ही अपेक्षा नव्हती की याच्याबरोबर फोटो काढशील", अशा अनेक कमेंट या फोटोवर केल्या आहेत. 

 दरम्यान, एमसी स्टॅनला 'बिग बॉस'मुळे लोकप्रियता मिळाली. 'बिग बॉस १६'चा तो विजेता ठरला होता. 'बिग बॉस'मुळे स्टॅनच्या चाहत्यावर्गात प्रचंड वाढ झाली. स्टॅन हा लोकप्रिय रॅपर आहे. त्याच्या कॉन्सर्टलाही चाहते गर्दी करतात. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबिग बॉसटिव्ही कलाकारऑफ द फिल्ड