Join us

अल्लू अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्री नसूनही दिसते इतकी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:48 IST

अल्लू अर्जुन सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे आणि वेगवेगळ्या भूमिका सक्षमरित्या साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याचा फॅन फॉलोविंग खूप आहे. अल्लू अर्जुनच्या वडिलांचे नाव अल्लू अरविंद असे आहे. तो त्यांचा मुलगा आहे. त्याचे काही नातेवाईक देखील चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत.

अल्लू अर्जुनला अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्याचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. त्याचे वडिल दिग्दर्शक आणि निर्माता. अल्लू अर्जुन तेलगू सुपरस्टार चिरंजीवीचा भाचा आहे. तर चुलत भाऊ रामचरण तेजा आहे. घरातच अशा चित्रपट क्षेत्रातील जाणकार व कलाकारांच्या सहवासात तो मोठा झाला. 

अल्लू अर्जुनचा जन्म चेन्नईत झाला होता. त्यानंतर त्याने त्याचे शिक्षणही पूर्ण केले. काही कालावधीनंतर त्याने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्याने गंगोत्री चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला होता. 

अल्लू अर्जुनचे लग्न २०११ साली झाले. त्याच्या पत्नीचे नाव स्नेहा रेड्डी असे आहे. ती ३५ वर्षांची आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. त्याला दोन मुलेही आहेत. सोशल मीडियावर अल्लू अर्जुन फॅमिलीचे फोटो शेअर करत असतो. 

अल्लू अर्जुनचा मागील वर्षी अला वैकुंठापुरमलू हा सिनेमा रिलीज झाला. त्याच्या वडिलांनीच निर्मिती केली होती. यात पूजा हेगडे अल्लूच्या अपोझिट दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.

तसेच त्याचा पुष्पा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना अपोझिट दिसणार आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुन