Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीला पाहिलंत का?, तिचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 07:00 IST

फार कमी जणांना क्रांती रेडकरच्या बहिणीबद्दल माहित आहे. तिचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

कोंबडी पळाली या गाण्यातून सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने बऱ्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. भले आता क्रांती चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. फार कमी जणांना क्रांती रेडकरच्या बहिणीबद्दल माहित आहे. तिचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या बहिणीचे नाव हृदया बॅनर्जी आहे. ती एक डान्सर आहे. याशिवाय ती एक निर्माती आहे. मॅंगोरेंज प्रोडक्शन्सची ती डिरेक्टर आहे. 

हृदयाने बंगाली सिनेमा तिन्को आणि मराठी चित्रपट काकणची निर्मिती केली आहे. क्रांती आणि हृदया यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात.

 

तीदेखील क्रांतीसारखी दिसायला खूप सुंदर आहे. हृदयादेखील तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. 

क्रांती रेडकरने बऱ्याच मराठी चित्रपटात काम केले आहे. यात जत्रा,फक्त लढ म्हणा, शिक्षणाच्या आयचा घो,पिपाणी आणि नुकताच येउन गेलेला नो एन्ट्री पुढे धोका आहे या चित्रपटांचा समावेश आहे.

इतकेच नाही तर तिने हिंदीतही काम केले आहे.  गंगाजल या हिंदी चित्रपटात तिने काम केले आहे. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.

टॅग्स :क्रांती रेडकर