Join us
Daily Top 2Weekly Top 5

Did you know ? आधी ‘या’ नावाने प्रदर्शित होणार होता शाहरुख खानचा ‘झिरो’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:35 IST

शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या अभिनयाने सजलेला ‘झिरो’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. या चित्रपटाचे नाव आधी काय होते माहित आहे?

शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या अभिनयाने सजलेला ‘झिरो’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. या चित्रपटाचे नाव आधी काय होते माहित आहे? कॅटरिना मेरी जान. होय, तुम्ही वाचले ते खरे आहे. ‘झिरो’या चित्रपटाचे आधी ‘कॅटरिना मेरी जान’ असे नामकरण करण्यात आले होते. खुद्द कॅटरिना कैफने ही माहिती दिली.कॅटरिना या चित्रपटात स्वत:चं स्वत:ची भूमिका साकारतेय, अशी चर्चा आहे. यावर खुलासा करताना कॅटरिना बोलत होती. ‘आधी या चित्रपटाचे नाव ‘कॅटरिना मेरी जान’ असे ठेवण्यात आले होते. खरे सांगते, आनंद एल राय (‘झिरो’चे दिग्दर्शक) यांची गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटासंदर्भात माझ्याशी चर्चा सुरू होती. कदाचित याचमुळे या चित्रपटात मी माझीच भूमिका साकारतेय, असा अनेकांचा समज झाला असावा,’ असे कॅटरिना यावेळी म्हणाली.तथापि ‘कॅटरिना मेरी जान’ हे नाव बदलून ‘झिरो’ का करण्यात आले, हे मात्र तिने सांगितले नाही. या चित्रपटात कॅटरिना कैफ एका व्यसनी अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे तर शाहरुख खान त्याच्या करिअरमधील आत्तापर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक अशा बुटक्या व्यक्तिची भूमिका वठवणार आहे. अनुष्का शर्मा यात महिला शास्त्रज्ञाची भूमिका साकाणार आहे. तूर्तास शाहरूख, कॅटरिना व अनुष्काचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. शाहरूखच्या चाहत्यांची उत्कंठा तर शिगेला पोहोचली आहे. येत्या 21 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

टॅग्स :झिरो सिनेमाशाहरुख खानकतरिना कैफ