बॉलिवूडमधील निर्माता करण जोहर आज आपला 49वा वाढदिवस साजरा करतो आहे. धर्मा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा यश जोहर यांचा करण हा मुलगा असून त्याने आज एक प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक अशी आपली ओळख निर्माण केली आहे. वाढददिवसानिमित्त जाणून घेऊया करणच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
राज कपूर, यश चोप्रा, सुरज बडजात्या यांच्या कामाचा त्याच्यावर खूपच प्रभाव होता. त्यामुळेच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राकडे दिलवाले दुल्हनिया ये जाएंगे या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिथेच तो चित्रपट निर्मितीतील अनेक बारकावे शिकला आणि कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या दिग्दर्शकीय करियरला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्याला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनं जिंकली.