Join us

मराठमोळा अभिनेता अमित खेडेकरच्या पत्नीला कधी पाहिलंत का?, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:58 IST

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं.  तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला हिरकणी फेम अभिनेता अमित खेडेकरबाबत सांगणार आहोत

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात  काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे  अमित खेडेकर आणि त्याच्या पत्नीची. अमितने हिरकणी, ह्रदयांतर सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.  खेडेकरच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.

अभिनेता अमित खेडेकरच्या पत्नीचं नाव रश्मी अनपट आहे. रश्मीने तिच्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. स्वभावाला औषध नाही. गाठीभेटी या नाटकांमध्ये तिने काम केले. यानंतर ती सुवासिनी मालिकेत झळकली होती. 'पुढचं पाऊल,' ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये रश्मीने काम केले.

कुलस्वामिनी' या मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रश्मीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. रश्मी आणि अमित नेहमीच एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री दिसून येते. 

 

टॅग्स :रश्मी अनपटटिव्ही कलाकार