Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा यांचं खरोखर अफेअर होतं का? समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 17:38 IST

शाहरुख खानचे जुने मित्र आणि अभिनेते विवेक वासवानी यांनी केला खुलासा

'राजू बन गया जेंटलमन' सिनेमातून शाहरुख खानला (Shahrukh Khan) बॉलिवूडमध्ये लाँच करणारे विवेक वासवानी (Vivek Vaswani) यांची मुलाखत व्हायरल होत आहे. शाहरुखबरोबर त्यांचं कसं नातं आहे याबद्दल त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. तसंच शाहरुख आणि प्रियंका चोप्रा यांच्यात खरंच अफेअर होतं का याचाही खुलासा त्यांनी मुलाखतीत केला आहे. 'डॉन' सिनेमाच्या वेळी शाहरुख आणि प्रियंका यांच्यातील अफेअरची जोरदार चर्चा होती. त्यानंतर दोघंही कधीच एकत्र दिसले नाहीत.

शाहरुख आणि प्रियंका यांच्यात काही संबंध होते का यावर सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विवेक वासवानी म्हणाले, "संबंध? म्हणजे सेक्शुअल संबंध? छे..तो तसा अजिबातच नाही. या चर्चा नेमक्या कुठून सुरु झाल्या मला माहित नाही. स्ट्रगलच्या काळात तो माझ्याच घरी राहायचा. करिअरचं टेन्शन होतं, गौरीशी लग्न करायचं होतं, मग यामध्ये रिलेशनशिप कुठून येईल? त्या दोघांमध्ये केवळ मैत्री होती पण संबंध अजिबातच नव्हते."

ते पुढे म्हणाले, "मी जितकं शाहरुखला ओळखतो तो एकपत्नीव्रता आहे. त्याच्याबद्दल फक्त प्रियंकासोबतचं अफेअर जोडलं गेलं जे खरं नव्हतंच. पण बाकी कुणाशीही त्याचं नाव जोडलं गेलं नाही. तो असाच आहे. जसेजसे तुम्ही मोठे होता, यश मिळतं तसं अनेक चर्चाही व्हायला सुरुवात होते. मात्र शाहरुखचं सर्वांशी केवळ मैत्रीचं नातं होतं. त्याचं प्रेम कायम गौरीवरच होतं आणि आहे."

शाहरुख खान आणि गौरी 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांना आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत. तर प्रियंकाही अमेरिकेत स्थायिक झाली असून संसारात व्यस्त आहे.  

टॅग्स :शाहरुख खानप्रियंका चोप्रारिलेशनशिपबॉलिवूड