Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागा चैतन्यशी लग्न ही सर्वांत मोठी चूक? नेमकं काय म्हणाली समंथा रुथ प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:12 IST

समांथा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. मोठा चाहता वर्ग असलेली समांथा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावरुनही ती आपल्या फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत संवाद साधत असते. तिच्या आयुष्यातील आठवणीतले प्रसंग, आनंदी क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. असा एकही दिवस नाही की समंथा रुथ प्रभूबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत नाही. नुकतंच चाहत्यांच्या प्रश्नाला समांथाने दिलेलं उत्तर आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सध्या ’आस्क मी एनिथिंग’ नावाचा ट्रेण्ड सुरु आहे. त्यात आपल्याबद्दल कोणताही प्रश्न फॉलोर्सला विचारण्याची संधी असते. स्वत:बद्दल इतरांना सांगणार्‍या या ट्रेण्डमध्ये समांथाही सहभागी झाली. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी तिने ‘आस्क मी एनिथिंग’द्वारे साधली. यावेळी तिनं  फॉलोअर्सच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. एका चाहत्याने समांथाला 'तू आयुष्यात कोणती सर्वांत मोठी चूक केली? ज्यातून तूला शिकायला मिळालं?' असा प्रश्न केला. 

या प्रश्नाचे उत्तर देताना समांथा म्हणाली, 'माझी सर्वांत मोठी चूक म्हणजे माझ्या आवडी-निवडी आहेत. त्या मला मला योग्यरित्या समजता आल्या नाहीत. एकेवेळी मी माझ्या जोडीदाराकडे खूप आकर्षित झाले होते. पण, मला ती चूक कळाली. तो कठीण काळ हा माझ्यासाठी एक धडा होता आणि त्या प्रसंगातून मला बरच काही शिकायला मिळाले'. समंथाच्या या उत्तराचा संबंध तिच्या पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता नागा चैतन्यशी असल्याचं चाहत्यांनी म्हटलं.

समांथाने नागा चैतन्यशी २०१७ मध्ये विवाह केला होता. परंतु २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. यानंतर समांथा मायोसिटिस नावाच्या आजाराची शिकार झाली होती. यामुळे अभिनेत्री अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहिली, तरीही समांथाने हार मानली नाही आणि कमबॅक करत प्रलंबित सिनेमाचं शूट पूर्ण केले. लवकरच ती 'सिटाडेल'मध्ये पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :समांथा अक्कीनेनीसेलिब्रिटीबॉलिवूड