Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानमुळे अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या रायचं नातं आलं होतं संपुष्ठात? 'धुरंधर' अभिनेता म्हणालेला-"माझी नजर तिच्यावरुन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:31 IST

Akshaye Khanna : अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयने करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्या रायसोबत काम केले होते आणि एकदा त्याने स्वतः तिच्या सौंदर्यावर फिदा असल्याचा खुलासा केला होता. ९० च्या दशकात दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा होती.

अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या गर्दीतही सध्या सर्वात जास्त चर्चा अक्षय खन्नाचीच होत आहे. अक्षयने करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्या रायसोबत काम केले होते आणि एकदा त्याने स्वतः तिच्या सौंदर्यावर फिदा असल्याचा खुलासा केला होता. ९० च्या दशकात दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा होती.

सध्या चित्रपट प्रेमींवर 'धुरंधर' चित्रपटासोबतच अक्षय खन्नाचीही मोहिनी पडली आहे. चित्रपटासोबतच लोक या अभिनेत्याचे भरभरून कौतुक करत आहेत. या चित्रपटातील त्याच्या 'रहमान डकैत' या भूमिकेवर चाहते फिदा  झाले आहेत. अक्षयने सुरुवातीच्या काळात अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे, ज्यापैकी एक ऐश्वर्या राय आहे. अक्षय ऐश्वर्याच्या सौंदर्याचा इतका वेडा होता की तो तिच्याकडे एकटक पाहत राहायचा. एक काळ असाही होता जेव्हा दोघांच्या नात्याची खूप चर्चा होती.

अक्षयने ऐश्वर्याच्या सौंदर्याचं केलं कौतुकअक्षय खन्नाने एकदा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमधील एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे मनमोकळेपणाने कौतुक केले होते. या शोमध्ये त्याला विचारण्यात आले होते की, बॉलिवूडमधील सर्वात 'सेक्सी' महिला कोण आहे? यावर त्याने उत्तर दिले होते, ''ऐश्वर्या राय''. असे म्हटले जाते की, अक्षय आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची ९० च्या दशकात मोठी चर्चा होती. त्यांचे नाव एकमेकांशी जोडले गेले होते. अक्षय खन्नाने स्वतः 'कॉफी विथ करण'मध्ये ऐश्वर्याच्या सौंदर्यावर फिदा असल्याची कबुली दिली होती. या शोमधील संभाषणादरम्यान तो म्हणाला होता, "जेव्हा जेव्हा मी तिला भेटतो, तेव्हा माझी नजर तिच्यावरून हटतच नाही. पुरुषांसाठी ही शरमेची गोष्ट आहे. पण तिला आता याची सवय झाली असेल. लोक तिच्याकडे टक लावून पाहत असतात." त्याने पुढे म्हटले होते की, "तशी मला कोणाकडे तरी पाहत राहण्याची सवय नाही, पण तुम्ही वेड्यासारखे तिच्याकडे पाहतच राहता."

सलमानची ऐश्वर्याच्या आयुष्यात एन्ट्री झाली, अन्अक्षय खन्ना ऐश्वर्याच्या सौंदर्याचे कौतुक करताना कधीच घाबरला नाही. रुपेरी पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. बातम्यांनुसार, दोघे जवळपास एक वर्ष नात्यात होते. मात्र, ऐश्वर्याने संजय लीला भन्साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' (१९९९) हा चित्रपट साइन केला आणि ती सलमान खानच्या जवळ आली, तेव्हा हे कथित प्रेमप्रकरण संपले.

करिश्मा कपूरसोबतही ठरणार होतं लग्न, पण..हा तो काळ होता जेव्हा अक्षय आणि करिश्मा कपूरच्या साखरपुड्याच्या बातम्याही वर्तमानपत्रात गाजत होत्या. रिपोर्ट्सनुसार, रणधीर कपूर यांना आपली मुलगी करिश्माचे लग्न अक्षय खन्नाशी लावून द्यायचे होते. त्यांनी अक्षयचे वडील विनोद खन्ना यांच्याकडे लग्नाचा प्रस्तावही मांडला होता. मात्र, असे म्हटले जाते की या लग्नासाठी करिश्माची आई बबिता तयार नव्हती आणि त्यांच्या विरोधामुळे हे नाते जुळू शकले नाही. आपल्या मुलीने करिअरच्या शिखरावर असताना लग्न करून चित्रपटसृष्टीपासून दूर जावे, असे बबिता यांना वाटत नव्हते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जर बबिता यांनी आक्षेप घेतला नसता तर अक्षय आणि करिश्माचे लग्न झाले असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan: Did he end Akshay, Aishwarya's relationship?

Web Summary : Akshay Khanna confessed to being smitten by Aishwarya Rai's beauty. Their relationship was rumored. Aishwarya's closeness with Salman during 'Hum Dil De Chuke Sanam' ended it. Akshay was also to marry Karishma Kapoor, which didn't happen.
टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चनअक्षय खन्नाधुरंधर सिनेमा