Join us
Daily Top 2Weekly Top 5

WHAT? सहा दिवसांपासून ‘ती’ घराबाहेर पडलेली नाही...; मलायका व अर्जुन यांच्यात बिनसलं...??

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:02 IST

Malaika Arora-Arjun Kapoor break-up: मलायका अरोरा हिच्या पर्सनल लाईफमध्ये फार काही ‘ऑल वेल’ नसल्याची चर्चा आहे. होय, मलायका व अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे.

बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या पर्सनल लाईफमध्ये फार काही ‘ऑल वेल’ नसल्याची चर्चा आहे. होय, मलायका व अर्जुन कपूर  (Arjun Kapoor) यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. मलायका व अर्जुन दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही बिनधास्त फिरताना दिसतात.  पार्ट्यांना एन्जॉय करतात. सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करतात. पण आता या लव्ह बर्ड्समध्ये काहीतरी बिनसल्याचं कळतंय. (Malaika Arora-Arjun Kapoor break-up)

बॉलिवूड लाईफ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मलायका व अर्जुनने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा दिवसांपासून मलायका तिच्या घराबाहेर पडलेली नाही. अगदी तिने स्वत: घरात कोंडून घेतलं आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, मलायका सध्या प्रचंड दु:खी आहे आणि कठीण काळातून जात आहे. गेल्या सहा दिवसांत अर्जुनही तिला भेटायला गेलेला नाही.

अर्जुनला काही दिवसांपूर्वीच कोरोना झाला होता. पण आता त्याची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी अर्जुन त्याची चुलत बहीण रिया कपूर हिच्या घरी डिनरला पोहोचला होता. रियाचे घर मलायकाच्या घरापासून अगदी जवळ आहे. पण   तिथे जाऊन सुद्धा तो मलायकाच्या घरी गेला नाही. डिनरनंतरही तो मलायकाला न भेटताच घरी परतला. याआधी अर्जुनच्या फॅमिली डिनरमध्ये मलायका त्याच्या सोबत दिसायची. पण यावेळी रियाच्या घरी अर्जुनसोबत मलायका दिसली नाही.

 सतत डिनर वा कॉफीच्या बहाण्याने एकत्र फिरणा-या मलायका आणि अर्जुनने एकमेकांना भेटणं थांबवलं असल्याचीही माहिती आहे. आता यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण तूर्तास मलायका व अर्जुन यांच्या काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली आहे. गेल्यावर्षी 1 जानेवारीला मलायकाने इन्स्टाग्रामवर अर्जुनसोबतचं नातं ऑफिशिअल केलं होतं. ‘ही एक नवी पहाट आहे, हा एक नवा दिवस आहे, हे एक नवं वर्ष आहे,’ असं म्हणत तिने अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरबॉलिवूड