Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दीया मिर्झाने लग्नात कन्यादान आणि पाठवणीला का दिला नकार? हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 11:49 IST

दीयाचे लग्न अनेकार्थाने खास ठरले. खास बात म्हणजे, दीयाच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी या दोन पारंपरिक विधींना फाटा देण्यात आला होता. असे का?

ठळक मुद्देदीयाचा पती वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने नुकतीच बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची अद्यापही चर्चा होतेय. फोटो आणि व्हिडीओंनी तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. दीयाचे लग्न अनेकार्थाने खास ठरले. तिच्या लग्नात एका महिला पुजारीने सगळ्या विधी केल्या. शिवाय लग्नातील सगळ्या वस्तू इकोफ्रेंडली होत्या. प्लास्टिक आणि थर्माकॉलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला होता. आणखी खास बात म्हणजे, दीयाच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी या दोन पारंपरिक विधींना फाटा देण्यात आला होता. असे का? तर आता खुद्द दीयाने याचे उत्तर दिले आहे.

दीयाने अगदी विचारपूर्वक तिच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी हे दोन विधी करण्याचे टाळले. दीयाचे मानाल तर, कन्यादान हे वडिल आपल्या मुलीला स्वत:पासून दूर करतात त्याचे प्रतिक आहे आणि पाठवणी हे घर सोडण्याचे प्रतिक. परंतु काळ आता बदलला आहे. तिच्या मते, आपण बदल स्विकारायला हवा. याच बदलाचा भाग होत, तिने तिच्या लग्नात लग्नात पुरुषाऐवजी एका महिला पुजाºयाने धार्मिक विधी केले. काही लोकांनी याबाबत टीका केली, मात्र या टीकारांना दीयाने अगदी विनम्र शब्दांत उत्तर दिले.

ती म्हणाली, ‘ लग्न हे दोन जिवांचा आत्मा असतो. या नात्यात प्रेम, आश्चर्य, विश्वास,  या गोष्टी असतात. त्यामुळे विधी कोणी केल्या यापेक्षा विधी का करतात, हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मी त्यानुसारच, बदल स्वीकारत मी काही विधींना फाटा दिला तर काही विधी मनापासून केल्या.  आजुबाजूला होणाºया बदलांची सुरुवात आपण आपल्या निवडीपासूनच केली पाहिजे.’

  दीयाचा पती वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

PICS : दीया मिर्झाच्या नवऱ्याची पहिली बायको जगते अलिशान आयुष्य, बोल्ड इतकी की पाहून व्हाल थक्क

टॅग्स :दीया मिर्झा