Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirm ! दीया मिर्झा प्रेग्नंट, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 20:27 IST

Dia Mirza Pregnant : तिच्या चेह-यावर प्रेग्नंसीचा ग्लोही झळकत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर अभिनेत्री दीया मिर्झा मालदीवला हनिमून ट्रीपवर गेली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा आई होणार आहे. बेबी बंप . नुकतेच दीयाने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत समर्क अशी कॅप्शनही दिली आहे. दीयाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या फोटो दीया फारच सुंदर दिसत आहे.

तिच्या चेह-यावर प्रेग्नंसीचा ग्लोही झळकत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर अभिनेत्री दीया मिर्झा मालदीवला हनिमून ट्रीपवर गेली आहे.तिथूनच दीयाने हा फोटो शेअर केला आहे. यावेळी दीयाची सावत्र मुलगी समायराही त्यांच्या सोबत गेली होती. दीया आणि समायराची या ट्रीपमध्ये चांगली गट्टीही जमल्याचं दिसत आहे. दीयाने समायरासह काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

१५ फेब्रुवारीला पाली हिल येथील इमारत बेल एअरमध्ये दीयाचा बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्नसोहळा पार पडला होतो. लग्नानंतर दीया मिर्झाला पहिल्यांदा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. त्याचवेळी दीया प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर चाहत्यांनी लावलेला अंदाज आज खरा ठरला आणि खुद्द दीयानेच ती प्रेग्नंट असल्याचे जाहीर केले. दीयाच्या या फोटोंवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दीयान लग्नानंतर एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘तुमचा भूतकाळ कितीही वाईट असो,पण तुम्ही नेहमीच एक नवी सुरुवात करू शकता,’असे बुद्धाचे वचन म्हणत लग्नाचे खास फोटो शेअर केले होते. दीयाचे हे दुसरे लग्न आहे. दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलला 2019 मध्ये घटस्फोट घेत ती वेगळी झाली होती.

दीयाच्या हृदयावर राज्य करणारा वैभव रेखी मोठा बिझनेसमॅन व इव्हेस्टर आहे. वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये.त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी आहे.

 

या लग्नानंतर वैभवची पत्नी  सुनैनादेखील तिची प्रतिक्रीया दिली होती. आमचे मुंबईमध्ये कोणी नातेवाईक नाहीत. पण या लग्नामुळे कुटुंबात नवे लोक जोडले गेले आहेत. माझी मुलगी समायराला एक नवी आणि मोठी फॅमिली मिळाली आहे. ती खूप खुश आहे. त्यामुळे मलाही या लग्नाबद्दल आनंदच आहे. मी दिया आणि वैभवला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते,’ असे ती म्हणाली होती. 

टॅग्स :दीया मिर्झा