Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीया मिर्झा व वैभव रेखीचे फोटो व्हायरल, लग्नाआधी मित्रांसोबत केली पार्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:40 IST

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर उद्या 15 फेबु्रवारीला दीया तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

ठळक मुद्देदीयाचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर दोघे 11 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2019 मध्ये सोशल मीडियावर विभक्त होत असल्याचे सांगितले होते.

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर उद्या 15 फेबु्रवारीला दीया तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे दीया व वैभव दोघांचेही दुसरे लग्न असणार आहे. तूर्तास दीयाचे लग्नाआधीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती वैभव व जवळच्या काही मित्रांसोबत पार्टी करताना दिसणार आहे. रिपोर्ट्नुसार, हे फोटो दीयाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे आहेत.

 दीयाच्या हृदयावर राज्य करणारा वैभव रेखी कोण आहे तर मोठा बिझनेसमॅन व इव्हेस्टर आहे. वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात. 

 स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दीया मिर्झा 15 फेब्रुवारीला वैभव रेखीसोबत सात फेरे घेणार आहे. यात तिचे काही खास फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर उपस्थित राहणार आहेत.  

दीयाचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर दोघे 11 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2019 मध्ये सोशल मीडियावर विभक्त होत असल्याचे सांगितले होते. दीया मिर्झा आणि साहिल संघा या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की, आम्ही वेगळे होत आहोत पण आमच्यात मैत्रीचे नाते नेहमीच राहील. आम्ही कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही नेहमी चांगले फ्रेंड्स राहणार आहोत आणि नेहमी एकमेकांचा आदर करणार आहोत. दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीयाने हना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :दीया मिर्झा