थिएटरमध्ये १००० कोटींची दणदणीत कमाई केल्यानंतर, रणवीर सिंगचा मुख्य अभिनय असलेला 'धुरंधर' चित्रपट आज ३० जानेवारी रोजी ओटीटीवर रिलीज झाला आहे. 'धुरंधर' कोणत्या ओटीटीवर रिलीज झाला आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 'धुरंधर' सिनेमा रात्री १२ वाजता नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. पण 'धुरंधर' पाहणाऱ्यांची मात्र घोर निराशा झाली आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या
चाहते का संतापले आहेत?चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. चाहत्यांचे म्हणणे आहे की, थिएटरमध्ये मिळालेल्या 'A' सर्टिफिकेटनंतरही ओटीटीवर चित्रपट सेन्सॉर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक शिव्या म्यूट केल्या आहेत आणि संवादांवर कात्री चालवण्यात आली आहे.
चाहत्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, "जेव्हा 'ॲनिमल' (Animal) आणि 'कबीर सिंह' (Kabir Singh) सारखे चित्रपट कोणत्याही कटशिवाय ओटीटीवर उपलब्ध होऊ शकतात, मग 'धुरंधर'वर सेन्सॉरची नजर का?" एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "आम्ही काय ५ वर्षांची मुले आहोत का? १८ वर्षांवरील लोकांसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे सेन्सॉरशिप करणे चुकीचे आहे. यामुळे चित्रपटाचा मूळ आत्मा निघून जातो." अशाप्रकारे थिएटरमध्ये 'धुरंधर' पाहणाऱ्यांना ओटीटीवर मात्र सेन्सॉर व्हर्जन पाहायला मिळत असल्याने त्यांची निराशा झाला आहे. याशिवाय असाही तक्रारीचा सूर निघत आहे की सिनेमाची लांबी १० मिनिटांनी कमी करण्यात आली आहे. थिएटरमध्ये 'धुरंधर' ३ तास ३४ मिनिटांचा होता. ओटीटीवर हाच सिनेमा ३ तास २५ मिनिटांचा आहे. यामागचं कारण म्हणजे, थिएटरमध्ये सुरुवातीला जे भलंमोठं Disclaimer दाखवण्यात आलं होतं ते ओटीटी व्हर्जनमध्ये काढून टाकण्यात आलं आहे. बाकी सिनेमातील कोणत्याही दृश्यावर कात्री नाहीये. Disclaimer काढल्यामुळे सिनेमाची ओटीटीवर लांबी ३ तास २५ मिनिटं झाली आहे.पुढील भाग कधी येणार?एकीकडे 'धुरंधर' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चर्चा असताना आता सर्वांना 'धुरंधर भाग २' (Dhurandhar Part 2) ची उत्सुकता आहे. 'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम केला आहे. तब्बल १००० कोटींची कमाई करणारा 'धुरंधर' सिनेमा सर्वांना आवडला आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, सारा अर्जुन, आर.माधवन, अर्जुन रामपाल या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' released on Netflix, but viewers were disappointed. The OTT version faced censorship, muting dialogues and shortening the film. Fans questioned the cuts, comparing it to other uncensored films. The movie's length is shorter by 10 minutes due to disclaimer removal. 'Dhurandhar 2' releases March 19.
Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर' नेटफ्लिक्स पर रिलीज हुई, लेकिन दर्शक निराश थे। ओटीटी संस्करण में सेंसरशिप की गई, संवादों को म्यूट किया गया और फिल्म को छोटा किया गया। प्रशंसकों ने अन्य अनसेंसर्ड फिल्मों की तुलना करते हुए कटौती पर सवाल उठाए। अस्वीकरण हटाने के कारण फिल्म की लंबाई 10 मिनट कम है। 'धुरंधर 2' 19 मार्च को रिलीज होगी।