Dhurandhar 2 Trailer: धुरंधरच्या पहिल्या भागानंतर 'धुरंधर २'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर २ द रिवेन्ज'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. अॅक्शन, बदला आणि देशभक्तीच्या भावनेने भरलेला हा खुंखार ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
'धुरंधर २'च्या ३.२५ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा रणवीर सिंगचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे. पाकिस्तानात जाऊन राहिलेला भारतीय गुप्तहेर हमजा अलीने रहमान डकैतचा खात्मा केल्यावर ल्यारीमध्ये काय घडतं याची छोटी झलक या आदित्ट्रेलरमधून दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात "हिंदु बहुतही डरपोक कौम है", या वाक्याने होते. ते ऐकून अजय संन्याल यांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचं दिसत आहे. त्यानंतर एकामागोमाग एक अॅक्शन सीन्स ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. "रहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीचा बादशाह कोण होणार?" असा प्रश्न पाकिस्तानात निर्माण झाल्याचं दिसत आहे. ल्यारीमध्ये हमजा अली त्याची ताकद आणखी वाढवणार का, याची उत्सुकता सिनेमा पाहताना असेल.
'धुरंधर' हमजा अलीचा प्रवास पाहायला मिळाला होता. पण, 'धुरंधर २'मध्ये जसकिरत सिंग रांगी याचा हमजा अली होण्याचा प्रवास आणि त्याची इनसाइड स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हमजा अलीची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे. तर 'धुरंधर २'च्या ट्रेलरमध्ये 'धुरंधर'मधली अजय संन्याल, यालिना जामली, मेजर इक्बाल, एसपी चौधरी, जमील जमली या पात्रांची झलकही दिसत आहे. मात्र 'धुरंधर २'च्या ट्रेलरमधून रहमान डकैतचं पात्र साकारणारा अक्षय खन्ना गायब आहे. त्यामुळे 'धुरंधर २'मध्ये अक्षय खन्ना दिसेल की नाही, याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
आदित्य धरने 'धुरंधर २'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, दानिश पंडोर, राकेश बेदी हे कलाकार दिसणार आहेत. येत्या १९ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Summary : The trailer for 'Dhurandhar 2' is out, promising intense action and revenge. Ranveer Singh returns as Hamza Ali, facing new challenges in Pakistan after eliminating Rahman Dakait. The film explores his transformation and features a star-studded cast. Releasing March 19th.
Web Summary : 'धुरंधर 2' का ट्रेलर रिलीज हो गया है, जिसमें जबरदस्त एक्शन और बदले की कहानी है। रणवीर सिंह हमजा अली के रूप में लौट रहे हैं, रहमान डकैत को खत्म करने के बाद पाकिस्तान में नई चुनौतियों का सामना कर रहे हैं। फिल्म उनकी परिवर्तन की कहानी दिखाती है। 19 मार्च को रिलीज।