Join us

धर्मेंद्र यांनी शेअर केला Video, सनी देओलचे मानले आभार; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 10:41 IST

सनी आणि धर्मेंद्र यांचा स्टायलिश लुक

अभिनेता सनी देओल (Sunny Deol) 'गदर 2' च्या यशामुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. सनीचा चार्म पुन्हा परत आलाय. शेवटी तो मोस्ट हँडमस अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा आहे म्हणल्यावर चार्म तर असणारच. नुकतंच सनी देओलने वडील धर्मेंद्र (Dharmendra) यांना अमेरिकेची ट्रीप घडवली. बापलेकाने ही युएस टूर खूप एन्जॉय केली. आता धर्मेंद्र यांनी व्हिडिओ शेअर करच सनीचे खास शब्दात आभार मानले आहेत.

धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ते सनी सोबत एका टेबलवर बसले आहेत. दोघांनी डोक्यावर कॅप घातली असून त्यांचा लुक एकदम स्टायलिश दिसतोय. धर्मेंद्र सनीचा हात पकडत आणि त्याच्या हातावर किस करत म्हणाले,'धन्यवाद सनी. मी ही ट्रीप खरंच खूप एन्जॉय केली. लव्ह यू बेटा! काळजी घे आनंदाचे दिवस येतील.' या व्हिडिओला कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'मित्रहो, मनापासून प्रेम आणि प्रार्थना..आनंदी राह, स्वस्थ राहा.' धर्मेंद्र यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळतोय.

धर्मेंद्र यांच्या या व्हिडिओवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. सनी देओचा मुलगा राजवीरने 'लव्ह यू बडे पापा' असं म्हणत आजोबांवर प्रेम व्यक्त केलंय. तर बॉबी देओलने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. सनीचा चांगला मित्र आणि अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा व्हिडिओवर रिअॅक्ट केले आहे.

यापूर्वी सनी देओलने सुपरस्टार धर्मेद्र यांच्यासोबत पिझ्झा खाण्याचा आनंद घेतानाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर केवळ बॉबी देओलच नाही तर ईशा देओलनेही कमेंट केली होती. सनी वडिलांसोबत गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत आहे. आधी धर्मेंद्र यांना उपचारासाठी तिथे नेल्याची चर्चा झाली होती. मात्र सनीने याचं खंडन केलं.

टॅग्स :धमेंद्रसनी देओल