Join us

लग्नात डान्स करताना धर्मेंद्र जखमी! आता कशी आहे तब्येत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 09:12 IST

उदयपूरमध्ये एका कौटुंबिक लग्नसोहळ्यात डान्स करताना धर्मेंद्र यांना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप काळजी वाटली होती. मात्र, नंतर धर्मेंद्र यांनी हा फोटो डिलीट केला. या फोटोविषयी आणि धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी महत्वाची माहिती समोर आलीय. धर्मेंद्र हे गेल्या दोन आठवड्यांपासून आजारी आहेत. याशिवाय  त्यांची पाठ अन् पायाला दुखापत झालीय.

 हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, धर्मेंद्र जखमी झाले असून गेल्या दोन आठवड्यांपासून आजारी होते. पण आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. धर्मेंद्र अलीकडेच सनी-बॉबी देओलसह उदयपूरमध्ये एका कौटुंबिक लग्नाला गेले होता. तिथे डान्स करताना ते जखमी झाले आणि त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला.

सूत्राने सांगितले की.. बदलतं हवामान, डान्स करताना झालेली दुखापत आणि म्हातारपण या अनेक गोष्टींमुळे धर्मेंद्र यांची प्रकृती आणखी बिघडली. आता त्यांची प्रकृती ठीक असून त्यांच्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होत आहे. धर्मेंद्र सुद्धा व्यवस्थित पथ्यपाणी करुन स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत आहे. धर्मेंद्र आपल्याला काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमात दिसले होते.

टॅग्स :धमेंद्रसनी देओलबॉबी देओल