Join us

Video: धनुषचं होतं ऐश्वर्यावर जीवापाड प्रेम; भर कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 19:08 IST

Dhanush: नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय जोडी विभक्त झाल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपस्टार धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या यांनीदेखील घटस्फोट होण्याचा निर्णय घेतला आहे.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय जोडी विभक्त झाल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपस्टार धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या यांनीदेखील घटस्फोट होण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १८ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडेच धनुषने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याविषयीची माहिती दिली. त्यामुळे सोशल नेटवर्किंगवर ही जोडी मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामध्येच या दोघांची लव्हस्टोरी, घटस्फोटामागील कारण, त्यांचे जुने व्हिडीओ असं बरंच काही ट्रेंड होतांना दिसत आहे. यामध्येच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यात त्यांच्यातील प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर धनुष आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धनुष ऐश्वर्यासाठी गाणं म्हणतांना दिसत आहे. इतकंच नाही तर भर कार्यक्रमात धनुषने या पद्धतीने व्यक्त केलेलं प्रेम पाहून ऐश्वर्या प्रचंड लाजत असल्याचं दिसून येत आहे. परंतु, या जोडीचा हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहते प्रचंड भावूक झाले आहेत.

दरम्यान, धनुषने ऐश्वर्यासाठी सासरे रजनीकांत यांच्या ‘पेट्टा’ चित्रपटातील ‘Ilamai Thirumbuthae’ हे गाणं गायलं होतं. परंतु, आता या दोघांच्या नात्यात अनेक चढउतार आल्याचं सांगण्यात येत आहे. धनुषने ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. 

काय आहे धनुषची पोस्ट?

‘मित्र, पती-पत्नी, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षं सोबत राहिलो. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा’, असं धनुषने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हीच पोस्ट ऐश्वर्यानेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

टॅग्स :धनुषTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी