Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:09 IST

धनुषची लव्हलाईफ, 'या' अभिनेत्रींच्याही प्रेमात होता अभिनेता?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता धनुष (Dhanush) सध्या चर्चेत आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री मृणाल ठाकूरला तो डेट करत असल्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगली आहे. धनुष आणि मृणाल यांच्यात ९ वर्षांचं अंतर आहे. तसंच धनुषचा दोन वर्षांपूर्वी रजनीकांत यांची लेक ऐश्वर्यासोबत घटस्फोट झाला आहे. त्याला यात्रा आणि लिंगा ही दोन मुलंही आहेत. दरम्यान मृणालआधी धनुषचं नाव इतरही काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. 

धनुषने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. समंथा, तृषा कृष्णन, साई पल्लवी, नित्या मेनन अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. धनुषने २००२ साली इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्याला २२ वर्ष झाली आहेत. या वर्षात त्याचं काही अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. त्यातच एक तृषा कृष्णन. तृषा साउथमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. २०१६ साली आलेल्या'कोडी' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्याआधीपासूनच दोघं एकमेकांना ओळखत होते. तेव्हा त्यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा होती. दोघांनी मात्र कधीच आपलं नातं मान्य केलं नाही.

धनुष कमल हासन यांची मुलगी श्रुती हासनलाही डेट करत होता. २०१२ साली आलेल्या '3' या सिनेमात ते एकत्र दिसले होते. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर गाजलीच होती. ऑफस्क्रीनही दोघांमध्ये रोमान्स फुलत होता अशी चर्चा होती. मात्र त्यांनीही नातं कधीच सार्वजनिकरित्या मान्य केलं नाही. २०१८ मध्ये त्यांची अफेअरची जोरदार चर्चा होती कारण त्यांना अनेकदा सोबत पाहिलं गेलं होतं. 

केरळची लोकप्रिय अभिनेत्री अमाला पॉलसोबतही धनुषचं नाव जोडलं गेलं आहे. अमाला मृणालच्याच वयाची आहे. धनुषसोबत अमालाचा 'रघुवरन बीटेक' सिनेमा आला होता. सिनेमाच्या प्रमोशनवेळी दोघांमधील बाँडिंग पाहून अनेकांना शंका आली होती. तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा जोर धरुन होत्या.

टॅग्स :धनुषमृणाल ठाकूरश्रुती हसनरिलेशनशिप