Join us

युझवेंद्रपासून घटस्फोट घेताच फळफळलं धनश्रीचं नशीब, पोस्ट शेअर करत म्हणाली "देवाचा प्लॅन.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:20 IST

धनश्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

Dhanashree Verma Film Debut: क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माच्या (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. काही दिवसांपुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज अधिकृतपणे मंजूर केला आणि दोघांचा चार वर्षांचा संसार मोडला. त्यानंतर आता धनश्री आणि युझवेंद्र हे एकमेकांचे पत्नी-पती राहिलेले नाहीत.  घटस्फोटानंतर युझवेंद्र आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तर धनश्री वर्माचं मात्र नशीबच उजळलं आहे. धनश्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीनं तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या म्युझिक व्हिडिओनंतर धनश्री आता चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. धनश्री बऱ्याच दिवसांपासून हैदराबादमध्ये तिच्या डेब्यू चित्रपटाचे शूटिंग करत होती.  आज धनश्रीने स्वतः चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

धनश्री ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवल्या जाणाऱ्या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. धनश्रीने पोस्टमध्ये लिहिले, 'आणि शूटिंग संपलं! माझा पहिला चित्रपट... माझा खास चित्रपट आणि हा खास हैदराबादसाठी आहे. पहिला चित्रपट पूर्ण केल्याची भावना वेगळीच असते... मी खूप उत्साहित आणि यासोबतच थोडी नर्व्हस आहे.  सुपर टीम आणि दिल राजू प्रॉडक्शनसोबत खूप छान वेळ घालवला. लवकरच थिएटरमध्ये भेटू... देवाचा प्लॅन", असं लिहून धनश्रीनं आनंद व्यक्त केलाय. 

धनश्रीने या पोस्टमध्ये तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आणि तिच्या भूमिकेबद्दल काहीही सांगितलेलं नाही. घटस्फोटानंतर, एकीकडे धनश्री सोशल मीडियावर सतत कामाची झलक दाखवतेय. तर दुसरीकडे, युजवेंद्र चहलचे नाव आरजे महवाश हिच्याशी जोडलं जात आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत.   

टॅग्स :सेलिब्रिटीयुजवेंद्र चहलसिनेमा