भारताचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा आज २० मार्च रोजी मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोट निश्चित होईल. आज धनश्री आणि चहल दोघेही न्यायालयात पोहोचले आहेत. अशातच आता धनश्री वर्माचं एक नवीन गाणं सध्या चर्चेत आहे. घटस्फोटाच्या दिवशीच धनश्री वर्माचे 'देखा जी मैंने देखा' हे गाणे प्रदर्शित झालं आहे.
'देखा जी देख मैं' या गाण्यात धनश्रीसोबत इश्वाक सिंग मुख्य भूमिकेत आहे. हे गाणे जानी आणि ज्योती नूरन यांनी गायले आहे. संशय, धोका आणि द्वेषामुळं तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं गाण्यात दाखवले आहे. या गाण्याला प्रेक्षक तिच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहत आहेत. हे गाणे 'पिंक सिटी' जयपूरमध्ये शूट करण्यात आलं आहे. या नव्या गाण्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
चहल-धनश्रीचे २०२० मध्ये लग्न झालं होतं. पण, काही वर्षांमध्येच त्यांच्यात दुरावा आला. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोर धरत होत्या. आता दोघेही अधिकृतपणे घटस्फोट घेत आहेत. युजवेंद्र धनश्रीला ४.५ कोटी पोटगी देणार असल्याचीही बातमी आली. गेल्या अडीच वर्षांपासून दोघंही वेगवेगळे राहत असल्याचा खुलासा त्यांनी काल कोर्टात केला. दुसरीकडे युजवेंद्र चहलच्या आर जे महावशसोबत अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. धनश्री वर्माच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं एक नृत्यांगना म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.