Join us

देवोलीनाने केला ऑनस्क्रीन दिरासोबत साखरपुडा?; फोटो होतायेत तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 11:38 IST

Devoleena bhattacharjee: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या देवोलीनाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिच्या प्रियकरासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena bhattacharjee). अलिकडेच देवोलीना बिग बॉस १५ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. त्यामुळे सध्या ती सातत्याने चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे या चर्चांमध्येच देवोलीनाने चाहत्यांना एक आनंदाचा धक्का दिला आहे. देवोलीनाने तिच्या प्रियकरासोबत साखरपुडा केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या देवोलीनाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिच्या प्रियकरासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने अभिनेता विशाल सिंहसोबत साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तिने दिलेल्या या गोड धक्क्यामुळे  चाहते भलतेच खूश झाले आहेत. परंतु, देवोलीना आणि विशालने खरंच साखरपुडा केलाय की हा मजेचा भाग आहे हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

विशालने त्याच्या इन्स्टाग्रामवर देवोलीनासोबतचे काही रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये देवोलीना तिच्या हातामधील अंगठी फ्लॉण्ट करत आहे. हा फोटो शेअर करत इट्स ऑफिशिअल असं कॅप्शन त्याने दिलं आहे. तसंच या फोटोमध्ये तो गुडघ्यांवर बसून तिला प्रपोज करत आहे.  

दरम्यान, विशालने शेअर केलेले फोटो देवोलीनानेदेखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच फायनली..लव्ह यू विशू, अशी कमेंट केली आहे. देवोलीना आणि विशाल यांनी साथ निभाना साथिया या मालिकेत एकत्र काम केलं आहे. या मालिकेत देवोलीनाने गोपी बहुची भूमिका साकारली होती. तर, विशालने जिगरची. या मालिकेमध्ये विशालने तिच्या दिराची भूमिका साकारली होती. या मालिकेसह विशाल 'कुछ ऐसा', 'कसम से', 'कुमकुम भाग्य' या मालिकांमध्येही काम केलं आहे.

टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन