Join us

देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 15:41 IST

मनोज वाजपेयींचा १०० वा सिनेमा 'भैय्याजी'चा ट्रेलर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (manoj bajpayee, bhaiyyaji)

मनोज वाजपेयी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते. मनोज वाजपेयींनी आजवर अनेक सिनेमांतून प्रेक्षकांंचं मनोरंजन केलंय. आता सर्वांना उत्सुकता आहे मनोज वाजपेयींच्या १०० व्या सिनेमाची. मनोज वाजपेयी त्यांच्या कारकीर्दीत १०० वा सिनेमा रिलीज करण्याच्या मार्गावर आहेत. हा सिनेमा म्हणजे 'भैय्याजी'. 'भैय्याजी' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये मनोज पहिल्यांदाच तगड्या अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहेत.

'भैय्याजी' च्या ट्रेलरची सुरुवात होते, तेव्हा दोन व्यक्तींमधला संवाद ऐकायला मिळतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भैय्याजी कोण आहेत हे सांगतो. मग मनोज वाजपेयींची एन्ट्री होते. ट्रेलरमधून पाहायला मिळतं की, मनोज वाजपेयींच्या भावाचा खून केलेला असतो. ज्याने खून केला त्या व्यक्तीचा आणि त्याच्या माणसांचा मनोज वाजपेयी बदला घेतात. ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी जबरदस्त मारधाड करताना दिसत आहेत. त्यांचा असा अवतार आपण याआधी पाहिला नसेल.

'भैय्याजी' हा मनोज वाजपेयींच्या कारकीर्दीतला १०० वा सिनेमा आहे. देसी सुपरस्टार अशी ओळख मनोज वाजपेयींची या ट्रेलरमधून करण्यात आलीय. अनेकांना हा ट्रेलर पाहून ;'गँग्ज ऑफ वासेपूर' सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 'भैय्याजी' सिनेमा २४ मे २०२४ ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना वाजपेयींचा हा १०० वा  सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूड