Join us

'तुम्हें आयने की जरुरत नहीं', अमृता फडणवीसांचं नवीन गाणं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:01 IST

अमृता यांचं 'तुम्हें आयने की जरुरत नही' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मिसेस उपमुख्यमंत्री याशिवायही त्यांची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. पेशाने बँकर असलेल्या अमृता या उत्तम गायिकाही आहेत. आजवर त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता नवीन गाणं घेऊन त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 

अमृता यांचं 'तुम्हें आयने की जरुरत नही' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली आहे. झी म्युझिकचं हे गाणं असून अमृता फडणवीसांच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आलं आहे. Meet Brosने या गाण्याला संगीत दिलं असून शबीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. अमृता यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

याआधी अमृता यांच्या 'मूड बनालिया', 'तेरी बन जाऊंगी', 'वो तेरे प्यार का गम', 'शिव तांडव स्त्रोतम', 'ये नयन डरे डरे' या गाण्यांना लोकप्रियता मिळाली. अमृता या अनेक कार्यक्रमांनाही उपस्थिती दर्शवताना दिसतात. अनेकदा त्या सोशल मीडियावरही समाजातील मुद्द्यांवर त्यांचं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात.  

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीस