Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवमाणूस' मालिकेत अजित कुमाराला धडा शिकवणाऱ्या मार्तंडला व्हायचे होते IPS, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:53 IST

देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला.

देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला. हि भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे अगदी चोख बजावतोय. मार्तंड जामकर यांच्या एंट्रीनंतर मालिका एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. मार्तंड अजितकुमारला कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

आपल्या या वेगळ्या आणि दमदार भूमिकेबद्दल मिलींद शिंदे म्हणाले, "मी एका चांगल्या भूमिकेची वाट बघत होतो. जास्तकरून खलनायक साकारल्यानंतर एक दमदार अशी भूमिका मार्तंड जामकरच्या रूपात माझ्या वाट्याला आली. एक इमानदार पोलीस अधिकारी ज्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा विश्वास आहे आणि तो कुठलीही केस तडीस नेतो अशी भूमिका मला देवमाणूस २ या लोकप्रिय मालिकेत साकारायला मिळाली याचा मला आनंद आहे."

 हि भूमिका मिलिंद शिंदे यांच्यासाठी खास का आहे याचं कारण सांगताना ते म्हणाले, "माझी आधी इच्छा होती कि मी आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हावं. जर मी अभिनेता नसतो झालो तर मी कदाचित आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झालो असतो आणि तो अधिकारी हा मार्तंड सारखाच असता. मार्तंड जामकर प्रमाणेच इमानदार, तत्वांशी बांधील असणारा, गुन्हेगारांना अद्दल घडवणारा असाच अधिकारी मी झालो असतो."

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटिव्ही कलाकार