Join us

आवडतं शहर कोणतं दिल्ली की मुंबई ? बघा मनोज वाजपेयींनी काय उत्तर दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 09:41 IST

मनोज वाजपेयी हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. बॉलिवूडसह (Bollywood) ओटीटी विश्वातदेखील त्याला बोलबाला पाहायला मिळतो. मनोज वाजपेयी यांचा प्रवास फार खडतर होता. ते अनेकवेळा त्याच्या मुलाखतीत त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढतात, त्याबद्दल बोलत असतात. मनोज वाजपेयी हे मुळचे बिहारचे तर दिल्लीत त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. तर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी व नाव कमवण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. 

मुंबईने मनोज वाजपेयी यांना काम, प्रसिद्धी सर्वच दिलंय. तसेच त्याचं दिल्लीवरचं प्रेम सर्वश्रुत आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये  दिल्ली आवडते की मुंबई? याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे. अभिनेता मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या ‘भैय्या जी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. २४ मे रोजी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी नुकतेच रियल हिट यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना मुंबई आणि दिल्लीवर भाष्य केलं. 

मनोज वाजपेयी म्हणाले, 'दिल्लीतील लोक म्हणतात, माझी ऑडी दुरुस्त करायची आहे, मी मर्सिडीजने येतोय. ते लोक कधीही कार असा शब्द वापरत नाहीत. मात्र, मुंबईतील लोकांना सर्व प्रकारच्या गाड्या पाहण्याची सवय आहे. मुंबईत एखाद्याने म्हटलं की माझ्याकडे मर्सिडीज आहे, तर दुसरा माझ्याकडे मासेराटी असं म्हणतो. मुंबईत मर्सिडीज किंवा मासेराटी चालवणारे लोकही ऑटोने प्रवास करतात. त्यांना त्याची लाज वाटत नाही. कारण त्यांना माहिती आहे की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा हा सर्वात चांगला पर्याय आहे. याबाबतीत मुंबई दिल्लीपेक्षा उजवी आहे. दिल्ली खूप सुंदर आहे. मात्र, मुंबईतील लोक त्यापेक्षा चांगले आहेत', असं ते म्हणाले.

मनोज वाजपेयी हे कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक हीट सिनेमा आणि सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत मनोज वाजपेयी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे 'भैय्याजी' हा मनोज वाजपेयींच्या कारकीर्दीतला १०० वा सिनेमा आहे.  भैय्याजी' सिनेमा २४ मे २०२४ ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना वाजपेयींचा हा १०० वा  सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. 'भैय्याजी' सिनेमाशिवाय मनोज हे 'फॅमिली मॅन 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात झाली आहे. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी यांच्यासह प्रियामणी, शरद केळकर, शारिब हाश्मी हे कलाकारही आहेत. 

टॅग्स :मनोज वाजपेयीसेलिब्रिटीबॉलिवूडदिल्लीमुंबई