Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:48 IST

परदेशात काय करतो अभिनेता? जुळ्या मुली हॉलिवूड इंडस्ट्रीत करतायेत काम

१९७५ साली रिलीज झालेला अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि शशी कपूर  यांचा 'दीवार' (Deewar) सिनेमा खूप गाजला. 'मेरे पास माँ है' हा सिनेमातला डायलॉग आजही अनेकांच्या ओठांवर असतो. या सिनेमात लहानपणीच्या अमिताभ बच्चनच्या भूमिकेत दिसलेला तो बालकलाकार आता काय करतो माहितीये का? तसंच हा अभिनेता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा सख्खा भाऊ आहे. सध्या तो परदेशात स्थायिक आहे. कोण आहे हा अभिनेता?

'दीवार' सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीची भूमिका करणारा अभिनेता मास्टर अलंकार नावाने लोकप्रिय आहे. त्याचं नाव आहे अलंकार जोशी. ७०-८० च्या दशकातील अनेक सिनेमांमध्ये तो बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. १०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये त्याने काम केलं. 'दीवार', 'मजबूर', 'सीता और गीता', 'शोले', 'जानवर और इंसान' हे त्यापैकीच काहीही गाजलेले सिनेमे आहेत.

'या' अभिनेत्रीचा सख्खा भाऊ आहे मास्टर अलंकार

अलंकार जोशी (Alankar Joshi) हा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती पल्लवी जोशीचा (Pallavi Joshi) मोठा भाऊ आहे. दीवार सिनेमासाठी अलंकारला यश चोप्रांनी बोलवलं होतं. तेव्हा लहानगी पल्लवीही दादासोबत गेली होती. अमिताभ बच्चन यांनी अलंकारला पाहिलं आणि ते यशजींना म्हणाले की, 'याला माझ्या लहानपणीची भूमिका द्या'. तेव्हाच अलंकारची 'दीवार'मध्ये छोट्या विजयच्या भूमिकेत निवड झाली. 

आता काय करतो अलंकार जोशी?

अलंकार जोशीला लहान वयातच प्रसिद्धी मिळाली. मात्र आपल्याला जे यश महान वयात मिळालंय तेच मोठेपणीही मिळेलच असं नाही हे त्याला तेव्हाच कळलं होतं. म्हणून त्याने अभिनयासोबतच शिक्षणही पूर्ण केलं. अमेरिकेत जाऊन सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली. इतकंच नाही तर एका मित्रासोबत मिळून स्वत:च एक आयटी कंपनी सुरु केली. ३५ वर्षांपासून तो अमेरिकेतच स्थायिक आहे. त्याच्या कंपनीचं गुडविल तब्बल २०० कोटी आहे.

अलंकारला जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. दोघीही मुली हॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत. अनुजा जोशीने 'हॅलो मिनी' या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तर मुलगा आशय संगीत क्षेत्रात आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीअमिताभ बच्चनबॉलिवूडपल्लवी जोशी