Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास-सैफच्या 'आदिपुरूष'मधून दीपिका पादुकोणची एक्झिट, तर क्रिती सनॉनची झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 19:57 IST

'आदिपुरुष' या चित्रपटात क्रिती सनॉनची एन्ट्री झाली आहे.

बाहुबली फेम अभिनेता प्रभास हा एकमागून एक हीट चित्रपट करण्याच्या तयारीत आहे. आता प्रभास 'आदिपुरुष' या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणाची कथा यात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि सैफ अली खान हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात क्रिती सनॉनचीही एन्ट्री झाल्याचे समजते आहे. 

क्रिती सनॉनने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचा आणि प्रभास व सनी सिंगचा फोटो शेअर करत लिहिले की, एका नव्या प्रवासाला सुरुवात होते आहे. माझ्या खूप खास व्यक्तींपैकी हे आहेत. आदिपुरुषचा भाग झाल्याबद्दल खूप आनंद आहे. असे सांगत क्रितीने तिच्या या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले. 

आदिपुरुषमध्ये प्रभास श्रीरामाची, क्रिती सीतेची आणि सनी लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आणखी कोण कोण कलाकार पहायला मिळणार, यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

आदिपुरूष या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी दीपिकाला निवडण्यात आली होती. मात्र दीपिकाने आणि प्रभास आधीच नाग अश्विनच्या चित्रपटात काम करणार आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपटांचे शूटिंग करणे शक्य होत नसल्याने दीपिकाने माघार घेतली. पण यामुळे क्रितीला मोठी भूमिका साकारायला मिळाली आहे. क्रितीचा प्रभास आणि सैफ सोबत 'आदिपुरुष' हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

टॅग्स :क्रिती सनॉनप्रभासदीपिका पादुकोणसैफ अली खान