Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दीपिका पादुकोणने अमिताभ बच्चन यांच्यावर केला होता हा विचित्र आरोप, तुम्हीही हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:55 IST

‘पीकू’च्या रिलीजदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या जुन्या व्हिडीओत दीपिका अमिताभ बच्चन यांच्यावर एक मोठा आरोप करताना दिसतेय.

ठळक मुद्देचर्चा खरी मानाल तर अमिताभ व दीपिका ही जोडी पुन्हा एकदा ‘द इंटर्न’ या सिनेमात एकत्र दिसणार आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण यांचा ‘पीकू’ हा सिनेमा खूपच गाजला होता. आगळीवेगळी कथा आणि दोघांचाही शानदार अभिनय पाहून प्रेक्षक भारावले होते. हा सिनेमा आठवायचे कारण म्हणजे, सध्या ‘पीकू’च्या रिलीजदरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या जुन्या व्हिडीओत दीपिका अमिताभ बच्चन यांच्यावर एक मोठा आरोप करताना दिसतेय. अमिताभ बच्चन माझे जेवण चोरतात, असे दीपिका या व्हिडीओत म्हणतेय.ये मेरा खाना चुराते है..., असे दीपिका भर पत्रकार परिषदेत म्हणते. तिचे ते शब्द ऐकून अमिताभ क्षणभर स्तब्ध होतात आणि हैराण होऊन तिच्याकडे बघतात. समोर बसलेले सर्व लोक मात्र दीपिकाचा हा आरोप ऐकून हसू लागतात. मग मात्र अमिताभही दीपिकाची मजा घेतात.

‘नाही, काय आहे बघा. आम्ही सामान्यपणे तीन वेळा जेवणारे लोक आहोत. हिचे वातावरण मात्र काहीसे वेगळे आहे. ही दर तीन मिनिटाला खात असते. आश्चर्य म्हणजे, दर तीन मिनिटाला खात असूनही ते जाते कुठे? मला जाणून घ्यायचे आहे. ही इतकी सडपातळ कशी?’, असे अमिताभ म्हणतात. अमिताभ यांचे हे शब्द ऐकून दीपिकाला हसू आवरत नाही.हा मजेदार व्हिडीओ दीपिकाच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.

चर्चा खरी मानाल तर अमिताभ व दीपिका ही जोडी पुन्हा एकदा ‘द इंटर्न’ या सिनेमात एकत्र दिसणार आहे. आधी या सिनेमात दीपिकासोबत ऋषी कपूर दिसणार होते. चित्रपटाची घोषणाही झाली होती. मात्र सिनेमाचे शूटींग सुरू होण्याआधी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जागी आता अमिताभ बच्चन यांची वर्णी लागल्याचे कळतेय.

टॅग्स :दीपिका पादुकोणअमिताभ बच्चन