Join us
Daily Top 2Weekly Top 5

 काय आहे दीपिका पादुकोणच्या ‘अदृश्य’ RK टॅटूचे गुपित? लेजर की मेकअपची जादू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 14:52 IST

‘छपाक’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोण नुकतीच ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर पोहोचली आणि सेटवरचा तिचा लूक लगेच व्हायरल झाला.

ठळक मुद्दे दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास, हा दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

छपाक’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोण नुकतीच ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर पोहोचली आणि सेटवरचा तिचा लूक लगेच व्हायरल झाला. मल्टिकलर पॅच आणि सोनेरी किनार असलेली कलरफुल साडी शिवाय निळ्या रंगाचा ब्लकलेस ब्लाऊज घातलेली दीपिका  इंडियन आयडलच्या मंचावर अवतरली आणि तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय दीपिकाची आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरली. होय, दीपिकाच्या मानेवरचा ‘आरके’ टॅटू गायब दिसला.

 होय, दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात दीपिकाच्या पाठीवरचा आरकेचा टॅटू गायब दिसला.  लग्नानंतर दीपिकाने हा टॅटू कायमचा काढून टाकला असा अंदाज यावरून बांधला जात आहे. अर्थात दीपिकाने हा टॅटू कायमचा काढून टाकला वा मेकअपने लपवला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना दीपिकाने तिच्या मानेवर आरके नावाचा टॅटू गोंदवला होत. पण कालांतराने दोघांमध्ये ब्रेकअप झाले. पण यानंतरही दीपिकाच्या मानेवरचा हा टॅटू कायम होता. अगदी 2018 मध्ये दीपिकाने रणवीर सिंगशी लग्न केल्यानंतरही हा टॅटू कायम होता. पण इंडियन आयडलच्या सेटवर दीपिकाच्या मानेवर हा टॅटू न दिसल्याने साहजिकच त्याची चर्चा रंगली.

 दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे झाल्यास, हा दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाक