Join us

रणवीर-दीपिकाला मुलगी होताच नेटकऱ्यांनी बाळासाठी सुचवलं 'हे' खास नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 15:27 IST

रणवीर - दीपिकाने मुलीला जन्म दिला. या दोघांच्या बाळासाठी नेटकऱ्यांनी एक खास नाव सुचवलंय जे ट्रेंडिंगवर आहे (ranveer singh, deepika padukone)

बॉलिवूडमधील चर्चेतलं कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी मुलीला जन्म दिला. दोघांचंही सोशल मीडियावर अभिनंदन होतंय. दोघांच्या चाहत्यांना या गोष्टीचा खूपच आनंद झाला असून त्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय. काल रात्रीच दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून गुड न्यूज कधी येतेय याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर काहीच वेळापूर्वी रणवीर-दीपिकाला मुलगी झाल्याची बातमी आली. ही बातमी येताच नेटकऱ्यांनी रणवीर-दीपिकाच्या मुलीसाठी खास नाव सुचवलंय, ज्याची चर्चा आहे.

रणवीर-दीपिकाच्या मुलीसाठी हे नाव ट्रेडिंगवर 

नेटकरी प्रत्येक गोष्टीत त्यांच्या आवडत्या कलाकारांना सल्ला, सुचना देत असतात. रणवीर-दीपिकाला बाळ होताच नेटकऱ्यांनी त्यांच्या मुलीला खास नाव सुचवलंय. हे नाव आहे राविका. दीपिका आणि रणवीर या दोघांच्या नावाचा संगम जुळवत नेटकऱ्यांनी या दोघांच्या मुलीचं नाव राविका असं सुचवलंय. आता रणवीर-दीपिकापर्यंत हे नाव पोहोचणार का? याशिवाय ही कलाकार जोडी त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

रणवीर-दीपिकाला झाली मुलगी

काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आज ते आईबाबा झाल्याने सर्वांना आनंद झालाय. दीपिकाने त्यांच्या पहिल्या लेकीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्माने दीपिका-रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दीपिकाने गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गोंडस लेकीला जन्म दिला. गणेश चतुर्थीला रणवीर आणि दीपिका सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर दीपिकाला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रणवीर-दीपिकाच्या बाळाची पहिली झलक बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.

 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण