Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gehraiyaan: सिद्धांतसोबतचे बोल्ड सीन्स देणं दीपिकासाठी सोपं होतं...! हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 10:49 IST

Gehraiyaan: स्वत:पेक्षा वयाने 7 वर्षाने लहान सिद्धांत चतुर्वेदीसोबत किसींग सीन देण्याचा दीपिकाचा अनुभव कसा होता? हा सीन देणं किती कठीण होतं?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या सिनेमामुळं चर्चेत आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सध्या याच ट्रेलरची चर्चा रंगलीये. ट्रेलरमध्ये दीपिका  पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचे बोल्ड इंटिमेट सीन्स पाहून चाहते अवाक् झाले आहेत. दीपिका व सिद्धांतच्या किसींग सीनचीही जोरदार चर्चा आहे.स्वत:पेक्षा वयाने 7 वर्षाने लहान सिद्धांत चतुर्वेदीसोबत किसींग सीन देण्याचा दीपिकाचा अनुभव कसा होता? हा सीन देणं किती कठीण होतं? याबद्दल दीपिका बोललीय. होय, तिचं खरं मानाल तर हा सीन देणं फार काही कठीण नव्हतं. 

काय म्हणाली दीपिका...?होय, तो किसींग सीन देणं माझ्यासाठी सोप्पं होतं. कारण मला दिग्दर्शकाचा हेतू माहित होता. दिग्दर्शक शकुन बत्राने आमच्याकडून अगदी सहजरित्या हा सीन करवून घेतला. शकुनने मला आणि आम्हाला सर्वांनाच एक कम्फर्ट दिला. कारण जेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटते तेव्हाच तुम्हाला इंटिमेट सीन करणं सोपं जातं. दिग्दर्शक केवळ लोकांचं लक्ष वेधण्यासाठी नाही तर कथेची आणि पात्रांची गरज म्हणून हा सीन करतोय, हे कळतं तेव्हा असे सीन्स देणे सोप्प होतं, असं दीपिका म्हणाली. मी याआधी कधीही आॅन-स्क्रीन इंटिमेट सीन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. जेव्हा मला चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा मलाही आश्चर्याचा धक्का बसला होता. या चित्रपटातील त्या इंटिमेट सीनचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. आम्ही याचा काही नवा शोध लावला आहे, असं काहीही नाही. याआधीही इंडस्ट्रीत असे सीन्स शूट झाले आहेत, असंही ती म्हणाली.   ‘गहराइयां’ चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्राने केलं आहे.  हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अनन्या पांडे   आणि सिद्धांत चतुर्वेदी लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय धैर्य करवा, नसीरूद्दीन शाह, रजत कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :दीपिका पादुकोणसिद्धांत चतुर्वेदीअनन्या पांडे