Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दीपिका पादुकोण गोव्याला परतली, नव्या जोशाने सिनेमाच्या शूटींगसाठी आहे तयार

By अमित इंगोले | Updated: October 16, 2020 15:36 IST

दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करत होती. तेव्हाच तिला एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आला होता.

सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी केली. आता दीपिका पुन्हा सिनेमाच्या शूटींगससाठी गोव्यालला परतल्याची माहिती समोर आली आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करत होती. तेव्हाच तिला एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आला होता. त्यामुळे ती शूटींग सोडून मुंबईला परतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका गुरूवारीच सिनेमाच्या शूटींगवर पोहोचली. इतकेच नाही तर शूटींगचा उत्साह सुद्धा तिच्यात चांगलाच आहे. असे सांगितले जात आहे की, दीपिका लॉन्ग ब्रेकवर होती. त्यामुळे दिग्दर्शकाची इच्छा होती की, तिने आरामात शूटींग करावं.

मिड डे ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, 'दीपिकाने गुरूवारीच शूटींगची टीम जॉईन केली आणि तिच्या कामाबाबत चांगलाच उत्साह सुद्धा बघायला मिळत आहे. १० दिवसांपेक्षा जास्त दिवस ब्रेकवर होती. त्यामुळे तिने आरामात शूटींग करावं अशी दिग्दर्शकांची इच्छा आहे. तिने सिद्धांत आणि अनन्यासोबत काही मजेदार सीन शूट केले आहेत. 

दरम्यान दीपिका पादुकोणला जेव्हा एनसीबीने करिश्मासोबत झालेल्या ड्रग चॅटबाबत विचारले तेव्हा दीपिकाने उत्तर दिलं होतं की, ते चॅट तिचंच आहे. यावर जेव्हा तिला विचारण्यात आलं की, 'माल', 'हॅश' आणि 'वीड' यात उल्लेख आहे. यावर दीपिकाने उत्तर दिलं की तिच्या सर्कलमध्ये मालचा अर्थ सिगारेट होतो. हॅशचा अर्थ बारीक सिगारेट आणि वीडचा अर्थ जाडी सिगारेट होतो. 

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडगोवा